नागपूर :  नागपुरात कोरोनाचा प्रसार वाढलाय अशा स्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुठे आहेत? असा प्रश्न काल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला होता. त्याला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषद घेऊन गडकरी आणि फडणवीस यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. पाठक म्हणाले की, अतुल लोंढे यांनी साधी पालिका निवडणूक लढवली नाही, ते अतुलनीय काम करणाऱ्या गडकरींवर चुकीचे आरोप करत आहेत.


भाजपच्या दाव्यानुसार नितीन गडकरींनी खालील गोष्टी केल्या आहेत.


1. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी गडकरी यांनी 'सन फार्मा'चे दिलीप सिंघवी यांच्याशी पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यानंतर आजवर नागपूरात 4900 व विदर्भात 500इंजेक्शन्स पोहोचले आहेत. 


2. 'मायलॉन लॅबरॉटरीज'चे भारतातील सीईओ राकेश बोमजाई यांच्याशीदेखील गडकरी यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला होता. त्यानंतर मायलॉनकडून आजवर नागपूरसाठी 6000 रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करण्यात आली आहे. 


3. अवघ्या पाच दिवसात असे एकूण 11400 रेमडेसिवीर इंजेक्शन्स नागपूरला मिळाले आहेत. 


कोरोना साथीत मंत्री नितीन गडकरी अॅक्टिव्ह मोडवर! फक्त विदर्भ किंवा नागपूरसाठी मदत नाही तर... 


4. रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात पंतप्रधान व केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशीदेखील गडकरी यांनी दूरध्वनीवरून पाठपूरावा केला असून रेमडेसिवीरची निर्मिती 10 लक्ष वायल प्रति महिना वाढवण्यास व नवीन प्रकल्प सुरू करण्यास मंजूरी मिळवून दिली. याचा केवळ नागपूरलाच नाही, तर संपूर्ण राज्याला फायदा होणार आहे. 


5 नागपूरमध्ये ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी 'भिलाई स्टील प्लॉट'शी संपर्क साधून 30टन ऑक्सिजन मिळवून दिले. हा ऑक्सिजन वितरित करण्यासाठी विशाखापट्टणम येथून टँकरचीही सुविधा उपलब्ध करून दिली.


6. नागपूरसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) मिळवून देण्यासाठीदेखील गडकरी प्रयत्नशील असून लवकरच १००० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 


7. नागपूरातील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता लक्षात घेता विशाखापट्टणम येथील एमपीझेड द्वारा निर्मित (किंमत केवळ २ लक्ष रुपये) १००० व्हेंटिलेटर्स नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यासाठीही गडकरी प्रयत्नशील आहेत. 


कोरोनाबाधितांवर उपचारांमध्येही 'जिसकी लाठी, उसकी भैंस', नेत्यांकडून इजेंक्शन वितरणात आपल्याच जिल्ह्याला झुकतं माप...


8 गडकरी यांच्या प्रयत्नांतून 'नागपूर एम्स'मध्ये केवळ दोन दिवसांत ६० वरून ५०० बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


9. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर येथे तातडीने २०० बेड्सना मंजूरी मिळवून देण्यात आली आहे. 


10. जी रुग्णालये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त बेड्स वाढवून मागत आहेत, त्यांना २४ तासांत सदर परवानगी मिळवून देण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत. 


Nagpur Coronavirus: नागपुरात कोरोनाने थैमान घातले असताना फडणवीस, गडकरी कुठे आहेत? काँग्रेसचा आरोप


11. 'स्पाईस जेट'चे मालक  अजय सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने आरटी -पीसीआर टेस्ट करणारी मोबाईल चाचणी किट नागपूरला उपलब्ध करून दिली आहे. ही किट आज रात्री नागपूरला पोहोचणार असून यामधून केवळ ३५० रुपये इतक्या नाममात्र शुल्कात चाचणी करता येणार आहे.


नागपूरात आरटीपीसीआर चाचण्या तातडीने व्हाव्यात यासाठी नितीन गडकरी यांनी 'स्पाईस जेट (हेल्थ)'चे मालक अजय सिंह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून आरटीपीसीआर टेस्टसाठी नागपूरला दोन मोबाईल चाचणी लॅब देण्याची विनंती केली. 'स्पाईस हेल्थ'ने ही विनंती मान्य करत मोबाईल टेस्ट लॅब ताबडतोप नागपूरला पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे. या एका लॅबमध्ये ३५० रुपयांत प्रति दिन ३००० लोकांच्या करता येऊ शकतील, असं यावेळी विश्वास पाठक यांनी सांगितलं.