नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील रुग्णांसाठी रेमडेसिवीर मिळावं म्हणून थेट दोन कंपनीच्या मालकांना फोन करुन मोठा सप्लाय निश्चित केला असल्याचं वृत्त समोर आलं होतं. तसेच नागपुरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, असा सवाल काँग्रेसनं केला होता. मात्र नुसते नागपूरच नाही तर महाराष्ट्राची संपूर्ण कोविड परिस्थिती आणि रेमडेसिवीरची उपलब्धता यासाठी नितीन गडकरी अॅक्टिव्ह मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यातील कोविड स्थितीसंदर्भात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. विदर्भात पुढील 48 तासांत मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणे आणि हिंगणा एमआयडीसीत ताबडतोब ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सरकारी परवानग्या आणि रेडटेपीजममध्ये दवाखाने आणि वैद्यकीय यंत्रणेला फसू न देता ताबडतोप निर्णय घेऊन लोकांना मदत पोहचवण्याचे स्पष्ट निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.


कोरोनाबाधितांवर उपचारांमध्येही 'जिसकी लाठी, उसकी भैंस', नेत्यांकडून इजेंक्शन वितरणात आपल्याच जिल्ह्याला झुकतं माप...

माहितीनुसार नितीन गडकरी यांनी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाचे डॉ. व्ही जी सोमाणी ह्यांच्याशी बोलून इंटलॅक्चुअल प्रॉपरटीझ राईट्स कायद्याला शिथिल करून इतर सर्व मोठ्या फार्मा कंपन्या रेमडीसीविर बनवू शकतील आणि स्वस्तात देऊ शकतील याची सोय करायला सांगितले.  नुसते नागपूरच नाही तर महाराष्ट्राची संपूर्ण कोविड परिस्थिती आणि रेमडेसिवीरची उपलब्धता करण्यासाठी काल प्रधानमंत्रीमोदी आणि केंद्रीय उर्वरक मंत्री मंसुख भाई मांडवीय यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी यावर रेमडेसिवीरचे प्रोडक्शन हे 10 लाख वायल प्रतिमाह वाढवायला 7 नव्या साईट्सला परवानगी दिली. 


 Nagpur Coronavirus: नागपुरात कोरोनाने थैमान घातले असताना फडणवीस, गडकरी कुठे आहेत? काँग्रेसचा आरोप


तसेच लोयड स्टीलचे मालक लंडनमध्ये आहे. त्यांना गडकरींनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीच्या दरम्यान लगेच फोन लावून वर्ध्याच्या प्लांटला ताबडतोब अॅक्टिव्ह करत 350 मेट्रिक टन ऑक्सिजन बनवण्याची सुरुवात परत करायला सांगितली. ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत फायदा होऊ शकेल. त्यांनीही तयारी दर्शवली.  तसेच sunflag कंपनीतील एका एक्सपर्टशी संपर्क साधला आणि असलेल्या सर्व महाराष्ट्राच्या ऑक्सिजन प्लांटची ऑक्सिजन निर्मिती कशी वाढवता येईल यावर काम करायला सांगितले. तसेच नितीन गडकरींनी लोकल इंडस्ट्रीवाल्यांशी संपर्क केला आणि त्यांनीही त्यांचा सर्व साठा हा रिजनसाठी वळवायला लावला आहे, अशी माहिती मिळाली आहे.