मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 14 हजार 372 नव्या रुग्णांची भर पडली असून 94 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 093 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 3221 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 94 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.84 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 97 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.63 टक्के आहे. सध्या राज्यात 10 लाख 69 हजार 596 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2731 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत मंगळवारी 803 नवे कोरोनाबाधित, तर 1 हजार 800 जण कोरोनामुक्त
मुंबईत नव्याने आढळणाऱ्या कोरोना बांधितांच्या संख्येत आता बऱ्यापैकी घट झाली आहे. सोमवारी (31 जानेवारी) एक हजारांखाली गेलेली रुग्णसंख्या आजतर आणखी कमी झाली आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे (Corona) नवे 803 रुग्ण आढळले असून 1 हजार 800 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 8 हजार 888 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नवी मुंबई पालिका प्रभाग रचनेत घोळ, वाॅर्ड नियमबाह्य तोडल्याने भाजपा न्यायालयात जाणार, मनपा अधिकार्यांवर कारवाईची मागणी
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद कायम, प्रकल्पग्रस्त पुन्हा करणार एल्गार, काम देखील बंद पाडणार
- नवी मुंबई पालिकेचा अभिनव उपक्रम, आता बसमध्येही ग्रंथालयाची सुविधा
- पायाभूत सुविधा आणि घरांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्प सकारात्मक, घरे स्वस्त होण्याचा जाणकारांचा अंदाज