Anil Parab : भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. आज, सत्र न्यायालयाने यावर निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब यांनी नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 


ते कोर्टात गेले, पण सरेंडर झालेले नाहीत. जोपर्यंत सरेंडर होत नाहीत, तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होत नाहीत. अटक होत नाही तोवर जामीन नाही मिळणार. हायकोर्टात गेले तरी पहिल्यांदा सरेंडर व्हावे लागेल. कारण सुप्रीम कोर्टाने त्यांना सरेंडर व्हायला पाठवले होते. दहा दिवसांची मुदत सरेंडर होण्यासाठी दिली होती. पण ते अद्याप सरेंडर झाले नाहीत. खुनानंतरचा सर्वात मोठा गुन्हा हा आहे. जो त्यांच्याकडून झालाय. कायदा सर्वांना सारखा आहे. कोर्ट कुणाचे नाहीय, असे वक्तव्य अनिल परब यांनी दिलेय. 



आज काय घडलं कोर्टात?
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज कोर्टात नितेश राणेंचा जामीन मेंटेनेबल नाही त्यामुळे फेटाळला असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे प्रथम न्यायालयाला शरण आलं पाहिजे होतं, मग अर्ज करणे अपेक्षित होते. न्यायालयात शरण न येताच जामीन अर्ज केला, त्यामुळे तो मेंटेनेबल नाही. असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सुप्रीम कोर्टाने दहा दिवसांची मुदत दिली आहे त्यामुळे कोठडी देता येणार नसतानाही पोलिसांनी त्यांची गाडी अडवली ही पोलिसांची दादागिरी आहे. तसंच हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, असं ते म्हणाले.   


रिसोर्टसंदर्भातील प्रश्नावर बोलताना अनिल परब म्हणाले की, या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. किरीट सोमय्या यांना एकतर माझी माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी द्यावे लागतील. मला दिलेल्या नोटीसीचे उत्तर दिले आहे. सरकारने ज्यांच्या नावावर रिसॉर्ट आहे, त्यांना नोटीस दिली आहे.