नवी मुंबई: स्वच्छतेसह विविध उपक्रम राबवण्यात नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) कायम पुढे असते. अशात आता नवी मुंबई महानगर पालिकेने लेट्स रीड फाउंडेशनच्या (Lets Read Foundation) सहकार्याने एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमान्वये नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये (Navi Mumbai Municipal Transport) आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात येणार आहे. ज्या बसेस (NMMT Bus) लांब पल्याच्या मार्गिकेवर धावतात त्या बसेस मध्ये प्रवास करणाऱ्यांकरता ही ग्रंथालयाची सुविधा करण्यात येणार आहे.
या ग्रंथालयामध्ये इंग्रजी, मराठी भाषांमधील नामवंत लेखकांची पुस्तके ठेवण्यात येणार आहे. प्रवास करणाऱ्यां प्रत्येकाला वाचण्याकरता ही पुस्तकं उपलब्ध असणार आहेत. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, प्रवास करताना नागरिकांनी त्यांचा वेळ मोबाईलमध्ये न घालवता पुस्तक वाचण्यात घालवावा यासाठी ही सुविधा करत एक उत्तम सवय नागरिकांना लागावी या दृष्टीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. परिवहन उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आज (रविवार) या ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा -
- सोमवारपासून शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही : आदित्य ठाकरे
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद कायम, प्रकल्पग्रस्त पुन्हा करणार एल्गार, काम देखील बंद पाडणार
- Tik Tok Video : टिकटॉकवर गंमत म्हणून व्हिडीओ काढणं महागात, मुरबाडमध्ये तरुणांना बेदम मारहाण
- Thane Crime News : घरफोडी आणि दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई
- पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम; हवेमध्ये धुळीचे कण, नागरिकांमध्ये भीती
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live