मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 13 हजार 840 नव्या रुग्णांची भर पडली असून 81 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 27 हजार 891 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 81 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 81 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74 लाख 91 हजार 759 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.26 टक्के आहे. सध्या राज्यात 8 लाख 52 हजार 419 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 52 लाख 54 हजार 877 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
संबंधित बातम्या:
- Goa Election : भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण : उत्पल पर्रिकर
- Blog : निवडणुकीपूर्वी गोयंकर शांत? की निकालादिवशी देणार 'दे धक्का'?
- Goa Election: गोव्याची निवडणूक ही 'मिस्टर अॅन्ड मिसेस'ची; पाच जोड्या निवडणुकीच्या रिंगणात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha