Covid19 Vaccine in India : भारताने लसीकरणामध्ये विक्रम केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात भारताने 200 कोटी लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. याबद्दल जगभरात भारताचं कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता बिल गेट्स यांनीही या विक्रमी लसीकरणाबद्दल भारताचं अभिनंदन केलं आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताने केवळ 18 महिन्यांमध्ये 200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, भारताने फक्त 18 महिन्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 200 कोटीहून अधिक डोस दिले आहेत.


बिल गेट्स यांच्याकडून अभिनंदन


बिल गेट्स यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. भारताचा 200 कोटी लसीकरणासाठी आणखी एक मैलाचा दगड. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय लस उत्पादक आणि भारत सरकार यांच्यासोबतच्या आमच्या भागीदारीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.'






देशात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात


कोरोना महामारी सुरु झाल्यापासून भारत कोरोनाविरोधात दोन हात करत आहे. कोरोना विषाणू आढळल्यानंतर एका वर्षाच्या आतच भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करत मोठ पायंडा रचला. देशात 16 जानेवारी 2021 पासून देशव्यापी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. आता भारताने 200 कोटी लसीचे डोस देत लसीकरणात मोठा विक्रम केला आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या