Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. गेले दोन दिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मागील दोन दिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याची नोंद झाली होती. पण आज पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात 40 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
दिवसभरात 18 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त
देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 25 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 45 हजार 654 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक नवे रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2279 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मंगळवारी दिवसभरात एकूण 2646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्येन नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे महानगरपालिकेतील आहे. पुणे महानगरापालिकेत सर्वाधिक म्हणजे 441 रुग्णांची भर पडली आहे.
मुंबईत मंगळवारी 284 रुग्णांची नोंद, 262 कोरोनामुक्त
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा स्फोट होताना दिसत आहे. मंगळवारी मुंबईत 284 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 262 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 99 हजार 816 वर पोहोचली आहे.