Maharashtra Coronavirus Update : रविवारी राज्यात 2591 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, एकही मृत्यू नाही
Maharashtra Coronavirus Update : राज्यात रविवारी दोन हजार 894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन हजार 591 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Maharashtra Coronavirus Update : राज्यात रविवारी दोन हजार 894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन हजार 591 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसा, राज्यात आज 2894 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,37,679 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.92% एवढे झाले आहे. राज्यात आज 2591 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 80,04,024 झाली आहे. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,23,82,440 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 80,04,024 (09.72 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण -
राज्यात सध्या 18 हजार 369 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यात राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमध्ये तीन हजार 753, ठाणे दोन हजार 259, पुण्यात सहा हजार 470 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सिंधुदुर्ग 95, सांगली 87, कोल्हापूर 97, जळगाव 77, नंदूरबार 31, धुळे 98, बीड 42, परभणी 10, हिंगोली 28, नांदेड 32, अमरावती 75, यवतमाळ83, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण 100 पेक्षा कमी आहेत.
आज मुंबईत सर्वाधिक वाढ -
राज्यात आज दोन हजार 591 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यामध्ये मुंबईत 399, पुणे 156, पुणे मनपा 548, पिंपरी चिंचवड 184 या ठिकाणी 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद आहे.
नव्या कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट, सक्रिय रुग्णांची संख्या मात्र 1 लाख 28 हजारांवर
देशात मागील 24 तासांत 18 हजार 257 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जाहिर करत ही माहिती दिली आहे. शनिवारी दिवसभरात 14 हजार 553 कोरोना रुग्णांनी विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 29 लाख 68 हजार 533 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 198 हून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मागील 24 तासांत 42 रुग्णांचा मृत्यू आहे. भारतात एकूण 5 लाख 25 हजार 428 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.