Maharashtra Corona Update : सोमवारी राज्यात 549 नव्या कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झालाय. राज्यात सर्वात जास्त म्हणजे मुंबईत 173 रूग्णांची नोंद झाली आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे कालच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येक घट झाली आहे. रविवारी राज्यात 1205 रूग्णांची नोंद झाली होती. रूग्ण संख्या घटन असल्याने ही दिलासादायक बाब आहे. संपूर्ण देशभर कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. 


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज 748 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,48,974 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.07 टक्के एवढे झाले आहे. 


तीन बाधिकांचा मृत्यू 


राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.  काल देखील तीन बाधितांचा मृत्यू झाला होता. 
 
देशातील स्थिती 


देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 5 हजार 910 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी 6 हजार 809 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे रविवारी तुलनेनं रुग्णांची संख्या 899 ने घसरली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याची बाब दिलासादायक आहे. याआधी 31 ऑगस्ट 2022 रोजी कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचली होती. तेव्हा 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. या आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत सतत घट होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. देशभरात कोरोना लसीकरणाची देखील संख्या वाढत आहे. त्यामुळेच नवीन रूग्णसंख्येत घट होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी अद्याप संपूर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतंय. 


महत्वाच्या बातम्या


Solapur News : आरोग्यमंत्र्यांनी शासकीय रुग्णालयाला दिलेल्या भेटीने डॉक्टर गडबडले, अपुऱ्या सुविधांमुळे व्यवस्थेवर नाराजी 


Covid19 Test on Animals : फक्त माणसांवरच नाही विंचू आणि माशांचीही होतेय कोविड टेस्ट, व्हिडीओ व्हायरल