Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना ( Corona) रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. मागच्या आठवड्यात कमी होत असलेल्या रूग्ण संख्येत या आठवड्यात चढ-उतार होत आहे. आज राज्यात 697 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. काल राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. तर आज राज्यात दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रूग्ण संख्येत चढ-उतार होत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोना रूग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. 


आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 984 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,61, 282 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11 टक्के एवढे झाले आहे. 


दोन बाधितांचा मृत्यू 
राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे.  काल राज्यत चार कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला होता. 


सक्रिय रूग्ण
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 4723 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 1217 सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबई पोठोपाठ पुण्यास 1145 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यानंतर ठाण्यात सध्या 880  कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. 


देशातील स्थिती 
राज्याप्रमाणेच देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 298 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्या आधीच्या दिवशी 6 हजार 422 कोरोना रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्येमध्ये 123 रुग्णांची घट झाली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजारांच्या पुढे पोहोचली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे प्राण गमावले आहेत.


महत्वाच्या बातम्या


Coronavirus : 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव वाचवता आला असता', संसदीय समितीचे केंद्र सरकावर ताशेरे 


Maharashtra Cabinet : कोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय