Coronavirus : जगभरासह भारतात अद्यापही कोरोनाचा (Coronavirus) कहर कायम आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झालेला पाहायला मिळतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) अनेकांनी आपला जीव गमावला. वाढते रुग्णांचे प्रमाण (Increasing Corona Patient), रुग्णालयात खाटा (Shortage of Bed) आणि ऑक्सिजनची कमतरता (Shortage of Oxygen), औषधांचा तुटवडा (Medicine Shortage) यांमुळे दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. जर सरकारने वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर अनेक रुग्णांचा जीव वाचवता आला असता, असं म्हणत संसदीय समितीने सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. संसदीय स्थायी समितीने राज्यसभेमध्ये 137 वा अहवाल सादर केला.


योग्य उपाययोजनांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, असं संसदीय स्थायी समितीनं या अहवालात म्हटलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवांचा तुटवडा, ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे इत्यादींची अवैध साठवण आणि काळाबाजार ही यामागची प्रमुख कारणं होती. संसदीय समितीने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या मते जर कोरोना विषाणू लवकरात लवकर ओळखण्यात सरकारला यश आले असतं आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धोरण योग्यप्रकारे अंमलात आणलं गेलं असते तर त्याचा परिणाम दिसून आला असता. आणि यामुळे अनेकांचा जीव वाचवता आले असते.


संसदी समितीच्या अहवालानुसार, भारत हा जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांपैकी एक आहे. देशाच्या मोठ्या लोकसंख्येमुळे कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करताना भारतापुढे मोठं आव्हान आहे. पायाभूत आरोग्य सुविधा आणि आरोग्य कर्मचार्‍यांची तीव्र कमतरता यामुळे देशावर प्रचंड दबाव आहे. संसदी समितीच्या मते, सरकारला अद्यापाही कोरोना विषाणूची तीव्रता आणि त्यानंतर कोरोनाचा विषाणूचा पुन्हा संसर्ग होणे याचा अचूक अंदाज लावता आलेला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या