मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 334 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
आज एकाही कोरोनाबाधितांचा मृत्यू नाही
राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही, राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33, 786 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 2175 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 2175 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1531 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 288 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
भारतात कोरोनाचे 2124 नवीन रूग्णांची नोंद
गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2124 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कोरोना संसर्गामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2,124 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, संसर्गाच्या रुग्णांची संख्या 4,31,42,192 झाली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 14,971 झाली आहे. वर गेला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे आणखी 17 रुग्ण दगावल्यामुळे देशातील मृतांची संख्या 5,24,507 झाली आहे. त्याच वेळी, उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.03 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.75 टक्के आहे. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. काल (मंगळवारी) राज्यामध्ये 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या