Navi Mumbai News : नवी मुंबईमधील अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाला जीवनदान देण्यात अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आलं आहे. नवी मुंबईतील अवघ्या 14 महिन्याच्या मुलीच्या श्वसनमार्गात शेंगदाणा अडकला होता. हा अडकलेला शेंगदाणा बाहेर काढण्यात रिजिड ब्रोन्कोस्कोपी प्रक्रिया तब्बल 30 मिनिटे सुरु होती.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील ईआरमध्ये तिला तातडीने इन्ट्युबेट आणि व्हेन्टिलेट केले गेले आणि इमर्जन्सी ब्रोन्कोस्कोपी यशस्वीपणे करून तिचे प्राण वाचवले गेले. श्वास घेण्यात त्रास आणि घरघर अशा तक्रारींसह या लहानग्या मुलीला जवळपासच्या वेगवेगळ्या आरोग्य सुविधांमध्ये भरती करण्यात आले होते, तिच्यावर एचआरएडी आणि एलआरटीए म्हणून उपचार करण्यात येत होते. तिची कोविड-19 तपासणी देखील पॉझिटिव्ह आली होती. पण या सर्व उपचारांनंतर देखील तिला होत असलेला त्रास सतत वाढत होता आणि गंभीर हायपोक्सिया सुरु झाला. तिला लगेचच अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या ईआरमध्ये आणले गेले. या बाळाला तातडीने इन्ट्युबेट आणि व्हेन्टिलेट केले गेले. हेमोडायनॅमिक स्टेबिलायजेशनसाठी तिला फ्लुईड ब्लॉल्यूजेस एफ/बी इनोट्रोपिक इन्फ्युजन्सची देखील गरज होती. तिच्यावर नेब्युलायजेशन, स्टेरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स अपग्रेडेशन असे उपचार केले गेले.
तपासणीमध्ये डॉक्टरांच्या लक्षात आले की, तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. प्राणवायूची पातळी कमी झालेली होती आणि तिच्या फुफ्फुसांमध्ये हवेची हालचाल नीट होत नव्हती. हाय पीईईपीवर देखील 90% ऑक्सिजन सॅच्युरेशन राखणे तिला शक्य होत नव्हते. गंभीर हायपोक्सिया आणि जवळपास तीन आठवडे सतत दिसून येत असलेली लक्षणे हे सर्व विचारात घेता, काहीतरी पदार्थ अडकला असण्याची शक्यता डॉक्टरांना दिसू लागली. या दरम्यान तिचा सीटी चेस्ट केला आणि त्यात एक पदार्थ डाव्या मेन ब्रॉन्कसला ब्लॉक करत होता. दरम्यान डॉक्टरांनी बाळाच्या पालकांकडून परवानगी घेतली. आणि डाव्या फुफ्फुसाच्या ब्रॉन्कसमधून संपूर्ण शेंगदाणा बाहेर काढला गेला. पण असा एक पदार्थ तिच्या श्वसनमार्गात इतका दीर्घकाळ अडकून होता त्यामुळे या सर्व प्रक्रिया करून देखील तिचे डावे फुफ्फुस संपूर्णपणे निकामी झालेले होते. प्रक्रियेनंतर बाळाला पीईईपी टीट्रेशन, चेस्ट फिजिओथेरपी, म्युकोलिटिक नेब्युलायजेशन आणि स्टेरॉइड्सची गरज होती. 5 दिवसांच्या ब्रोन्कोस्कोपीनंतर बाळाला यशस्वीपणे एक्सट्युबेट केले गेले.
या संदर्भात डॉ. हेमंत लाहोटी, कन्सल्टन्ट - पेडियाट्रिक सर्जन, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, "मुलांच्या शरीरात अशा प्रकारे काहीतरी पदार्थ, वस्तू जाणे ही खूप जास्त प्रमाणात आढळून येणारी समस्या आहे. अशी समस्या जीवावर बेतू शकते त्यामुळे निदान करून घेण्यात अजिबात उशीर न करता, तातडीने योग्य उपचार करून घेतलेच पाहिजेत. रिजिड व्हेंटिलेटिंग ब्रोन्कोस्कोपी ही प्राणरक्षक प्रक्रिया आहे, तज्ञ, कुशल डॉक्टरांनी ही प्रक्रिया केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात. सर्वोत्तम परिणाम हे फक्त एखाद्या टर्शियरी केयर सेंटरमध्येच मिळू शकतात, जिथे तज्ञांची मल्टिडिसिप्लिनरी टीम उपलब्ध असते."
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :