Nashik BJP Agitation : राज्यात पेट्रोल डिझेल भाव गगनाला भिडल्यानंतर अनेक आंदोलनानंतर केंद्र सरकारने दर कमी केले. त्यानंतर दोनच दिवसात राज्य सरकारने देखील कमी केले. मात्र अद्यापही इंधन दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने दर कमी करावेत, अशी मागणी भाजयुमोच्या वतीने करण्यात आली.
नाशिकमध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे एल्गार आंदोलन करण्यात आले. पेट्रोलचे दर कमी करण्यात यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्यसरकने पेट्रोल डिझेल वरील टॅक्स ५० टक्के कमी करावा अशी मागणी देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.
दरम्यान नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकावर ताशेरे ओढले. 'मद्यावरचा टॅक्स पन्नास टक्के कमी करू शकतात, मात्र -पेट्रोलचा टॅक्स कमी का करू शकत नाही', असा सवाल यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला आहे. आंदोलन प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी ' इंधन दर कमी करा, ठाकरे सरकार हाय हाय, कमी करा, कमी करा इंधन दर कमी करा, राज्य सरकार हाय हाय या सारख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी युवक युवतींनी आय आंदोलनात सहभागी पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. यावेळी आंदोलक म्हणाले कि, सद्यस्थितीत पेट्रोल १११ रुपयांवर आले आहे. असे असतांना राज्य सरकार दर कमी करत नसल्याने सर्वसामान्याना फटका बसत आहे. पुढील काही दिवसांत पेट्रोलचा दर कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आंदोलनांचा भडीमार
एकीकडं राज्यात भाजप शिवसेना वाद चांगलाच रंगला असून प्रत्यके जिल्ह्यात महाविकास आघाडी भाजप एकमेकांविरुद्धच्या आंदोलनात उभेत ठाकले आहेत. थोड्यात दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगु वाजणार असून या पार्श्वभूमीवर हि आंदोलने होत असल्याचे इतर पक्षाचे म्हणणे आहे. मात्र आंदोलन, सभा, मोर्चे यांना राज्यात ऊत आलेला आहे. त्या सगळ्या गदारोळात पाणी, आरोग्य, रोजगार या सारखे प्रश्न मागे राहिले आहेत.