Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 295 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी बारा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बुधवारी 194 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 1531 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,42,474 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 3973 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.017% टक्के इतका आहे. 






सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1531 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 288 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 205 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 20, रायगड 40, पालघर 24, अमरावती 10 आणि नागपूरमध्ये 11 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 2175 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 334  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही, राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33,  786 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज एकूण 2175 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2124 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कोरोना संसर्गामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Coronavirus Update : राज्यात बुधवारी 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 334 रुग्ण कोरोनामुक्त


Mumbai Corona Update : मंगळवारी मुंबईत 218 नव्या रुग्णांची भर, 1430 सक्रिय रुग्ण