Maharashtra Corona Update: राज्यात आज 460 रुग्णांची नोंद तर पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर घटला असून तो 1.82 टक्के इतका झाला आहे.
मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 460 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नव्हता. राज्यात गेल्या 24 तासात 718 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 3209 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 3209 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 1187 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल 467 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशातील स्थिती
देशात गेल्या 24 तासांत 3993 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र यावेळी कोरोनाबळींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि 66 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 49,948 इतकी झाली आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 5,15,210 वर पोहोचला आहे. एकूण 4 कोटी 24 लाख 6 हजार150 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 663 दिवसांत पहिल्यांदाच कोविड-19 च्या सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. शेवटच्या वेळी भारतात 4,000 च्या खाली कोरोनाचे नवे रुग्ण 15 मे 2020 रोजी नोंदवण्यात आले होते, तेव्हा देशात 3,967 नवीन रुग्णांची नोंद झाली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha