Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख आता खाली उतरत आहे. आजही राज्यातील आकडेवारी काहीसा दिलासादायक आहे. राज्यात आज 59 हजार 073 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34 हजार 848 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 47 लाख 67 हजार 053 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.2% एवढे झाले आहे.
राज्यात आज 960 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 08 लाख 39 हजार 404 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 लाख 44 हजार 063 (17.33 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 लाख 47 हजार 653 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28 हजार 727 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 4 लाख 94 हजार 032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत आज 1447 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत आज 1447 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 6 लाख 34 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट सध्या 92 टक्क्यांवर आहे. मुंबईत सध्या 36 हजार 674 अॅक्टिव रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 213 दिवसांवर गेला आहे.
31 मे पर्यंत राज्यांना 192 लाख कोविड लस केंद्र देणार
केंद्र सरकारने शुक्रवारी पुढच्या पंधरवड्यात 16 ते 31 मे दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 192 लाख कोविड लस पुरवण्याची घोषणा केली. या पंधरवड्यात, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या 191.99 लाख डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनाशुल्क पुरवले जातील. गेल्या पंधरवड्यात म्हणजे म्हणजे 1-15 मे 2021 मध्ये केंद्र सरकारकडून राज्यांना 1.7 कोटीहून अधिक डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, राज्ये तसेच खासगी रुग्णालयांसाठी मे महिन्यात 4.39 कोटी लस थेट खरेदीद्वारे उपलब्ध करुन दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- भारताला लवकरच Pfizer चे पाच कोटी डोस मिळण्याची शक्यता, चर्चा अंतिम टप्प्यात
- 'गंगाने बुलाया है' असं म्हणणाऱ्यांनी गंगेला अश्रू दिले; काँग्रेस नेते राहुल गांधींची पंतप्रधानांवर घणाघाती टीका
- Corona Vaccination : ब्रिटनने दोन डोसमधील अंतर कमी केलं, आठ आठवड्यात मिळणार कोरोनाचा दुसरा डोस
- Mamata Banerjee Brother Death | ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचं कोरोनामुळे निधन