नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीवरुन सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. जी व्यक्ती गंगाने बुलाया है असं म्हणत होती त्यांनेच गंगा नदीची वाताहत केली, तिला अश्रू दिले अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर प्रेतं तरंगत असल्याचं दिसून येतंय. 


राहुल गांधी म्हणाले की, "जी व्यक्ती सांगत होती की गंगाने मला बोलवलंय, त्याच व्यक्तीने गंगाला अश्रू दिले आहेत." 


 




उत्तर भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ एवढी मोठी आहे की त्यामुळे प्रेतांना अग्नी द्यायला स्मशानभूमींची संख्या कमी पडत आहे. अशावेळी अनेक प्रेतं गंगा नदीमध्ये सोडली जात आहेत. एका हिंदी दैनिकाच्या वृत्तानुसार, गंगा नदीत दोन हजारांहून जास्त प्रेतं सोडण्यात आली आहेत.त्यावर राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केलीय.


त्या आधी एक दिवस काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, "बालिया आणि गाजीपूरमध्ये गंगा नदीमध्ये प्रेतं तरंगत आहेत. उन्नावमध्ये नदी किनारी मोठ्या प्रमाणावर प्रेत जाळल्याच्या बातम्या येत आहेत. लखनऊ, गोरखपूर, झाशी आणि कानपूर या शहरांत कोरोनाचे आकडे कमी करुन सांगितले जात आहेत."


राहुल गांधींनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आधी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की, "देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही."


महत्वाच्या बातम्या :