Maharashtra Corona Update : राज्यात आज 1,782 नव्या रुग्णांचे निदान, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.02 टक्के इतकं झालं आहे तर मृत्यू प्रमाण 1.83 टक्के इतकं झालं आहे.
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1854 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची राज्यात आज एकूण 11,889 इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमध्ये 3127 इतके सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल पुण्यामध्ये 2672 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1120 रुग्ण आहेत.
राज्यात आतापर्यंत 79,02,480 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 इतके झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण 1.83 टक्के इतके झाले आहे.
देशातील स्थिती
देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 751 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याआधी रविवारी 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. दुसरी चांगली बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सोमवारी दिवसभरात देशात 16 हून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची घटती संख्या ही मोठी दिलासादायक बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यासोबतच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने घट होताना पाहायला मिळत आहे. सध्या देशात 1 लाख 31 हजार 807 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात आजपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 5 लाख 26 हजार 772 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.30 टक्के आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा दर 98.51 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 412 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गावर मात केलेल्यांची संख्या 4 कोटी 35 लाख 16 हजार 71 इतकी झाली आहे.
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 479 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
संबंधित बातम्या