मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर होणार आहे. सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांसह लग्न सोहळ्यांवर  कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. हॉटेल , रेस्टॉरंट, बार यावरती ही कडक निर्बंध आणावेत अशी मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. तर 31 डिसेंबरला मुंबईतील चौपाटी, मरीन ड्राईव्ह आणि गेटवे वरती पूर्णपणे परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. कोरोनाचं संकट वाढत असल्यानं मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांच्यात झालेल्या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा झालीय. 


नवी मुंबईत सोसायटीमध्ये पार्टी करणे पडणार महागात


थर्टीफस्टनिमित्त सोसायटीच्या आवारात, गच्चीत नाचगाणं, दंगा करणं, जोरदार सेलिब्रेशन करणं महागात पडू शकतं.. कारण जर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन केलंत तर पोलीस कारवाई तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महानगरपालिका आणि पोलीसांकडून निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे दारु पिऊन धिंगाणा घालणं, मद्यपान करुन रस्त्यांवर गाडीने हॉर्न वाजवत राऊंड मारताना पोलिसांच्या तावडीत जर तुम्ही सापडलात तर थेट सरत्यावर्षात आणि येत्या नववर्षात जेलवारी घडू शकते.. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे...


सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या: