मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज   544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 515  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 98  हजार 015 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 


राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही


राज्यात  आज ओमायक्रॉनचा एकाही  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 54 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 31 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 093 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 81 हजार 661 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 877 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 77 , 71, 676 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


भारतात (India) सध्या कोरोनाचे 82 हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत, ही 572 दिवसांतील सर्वात सक्रिय रुग्णांची नोंद आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 563 नवीन रुग्ण आढळले असून 132 लोकांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर, 8077 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच 1 हजार 646 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. मात्र दुसरीकडे देशातील कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे संकट वाढत आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे 159 रुग्ण आढळले आहेत.


 देशात वर्षभरातील सर्वात कमी सक्रिय कोरोनारुग्णांची नोंद


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 47 लाख 46 हजार 838 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 77 हजार 554 लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत तीन कोटी 41 लाख 87 हजार लोक बरे झाले आहेत.



  • भारतातील एकूण कोरोना रुग्ण : 3 कोटी 47 लाख 46 हजार 838

  • सक्रिय प्रकरणे: 82 हजार 267

  • एकूण वसुली : 3 कोटी 41 लाख 87 हजार 017

  • एकूण मृ त्यूः 4 लाख 77 हजार 554

  • एकूण लसीकरण : 137 कोटी 67 लाख 20 हजार 359


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या :