Omicron Cases in India : देशातील ओमायक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत दोन नवे ओमायक्रॉन ग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीतील ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 24 झाली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, 24 रुग्णांपैकी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत भारतात ओमायक्रॉनची 150 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.
देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 159 वरराज्यात आज दिल्लीत दोन नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. रविवारी आठ नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली होती. यामध्ये 45 वर्षीय अनिवासी भारतीय आणि नुकताच ब्रिटनमधून गुजरातला परतलेल्या किशोरवयीन मुलाचा समावेश आहे. नवीन रुग्णांमधील गुजरातमधील एकूण रुग्णांची संख्या 15 झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्णरविवारी ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात नवे सहा रुग्ण आढळले आहेत. केंद्र आणि राज्य अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉनचे महाराष्ट्र - 54, दिल्ली 24, राजस्थान 17, कर्नाटक 14, तेलंगणा 20, गुजरात 15, केरळ 11 तर आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : धोक्याची घंटा! संकटाचा सामना करण्यास तयार राहा - AIIMS संचालक रणदीप गुलेरिया
- खड्ड्यांची माहिती देणारं सरकारी अॅप; रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नेव्हिगेशन अॅप लाँच
- The Kashmir Files : 'द काश्मीर फाईल्स'चे पोस्टर प्रदर्शित, काश्मिरी पंडितांच्या संघर्षाची कहाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha