The Kashmir Files : विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये काश्मीरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) संघर्षाच्या कहाणीवर आधारित आहे. नुकतच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी साकारलेल्या चित्रपटातील मुख्य पात्रांपैकी एकाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. 


बहुचर्चित चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ जगभरात प्रदर्शित होण्याच्या एक महिना आधीच प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) तत्त्वज्ञानाचे सेवानिवृत्त प्राध्यापक पुष्कर नाथ पंडित (Pushkar Nath Pandit) यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हे पात्र श्रीनगर (Srinagar) मधील रहिवासी असल्याचे दाखवण्यात आले असून त्यांना मुलगा, सून आणि दोन नातवंडे आहेत. 19 जानेवारी 1990 च्या भयंकर रात्री त्यांना काश्मीरमधून पळून जावे लागले आणि पुढे काय होते, हा संघर्षमय प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 



'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. ही कथा काश्मिरी पंडित समुदायाच्या काश्मीर नरसंहारातील पहिल्या पिढीतील पीडितांच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित आहे. यामध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदना, दुःख, संघर्ष आणि आघात यांचे हृदयद्रावक वर्णन आहे आणि लोकशाही, धर्म, राजकारण आणि मानवतेबद्दल डोळे उघडणारे प्रश्न यांचं दर्शन या चित्रपटाद्वारे घडणार आहे.


विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, एक्झोडस या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासह मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) या कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha