मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात आज तब्बल  18 हजार 466 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने  अठरा हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.  तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  


राज्यात आज 75  ओमायक्रॉनबाधितांची नोंद


राज्यात  आज  75  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 653 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


मागील  दहा  दिवसातील  रूग्ण संख्या 


3 जानेवारी - 12, 160 रूग्ण
2 जानेवारी - 11, 877 रूग्ण
1 जानेवारी - 9,170 रूग्ण
31 डिसेंबर - 8067 रूग्ण
30 डिसेंबर -  5368 रूग्ण
29 डिसेंबर - 3900 रूग्ण
28 डिसेंबर – 2172 रूग्ण
27 डिसेंबर –  1426 रूग्ण
26 डिसेंबर – 1648 रूग्ण
25 डिसेंबर –  1485 रूग्ण


राज्यात आज 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज  20  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 66  हजार 308 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 18 हजार 916 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के आहे.   सध्या राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 95 , 09, 260 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत  गेल्या 24 तासात 10 हजार 860 रुग्णांची भर


 मुंबईत आज 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सोमवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तो चिंतेचा विषय आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :