Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 1189 कोरोना रुग्णांची नोंद तर 1142 रुग्ण कोरोनामुक्त
Corona Update : राज्यात एकूण 12148 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5218 इतके रुग्ण
मुंबई : राज्यात आज 1189 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death)
राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,13,209 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 12148 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
राज्यात एकूण 12148 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5218 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये 1960 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत सोमवारी 584 रुग्णांची नोंद
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज मुंबईत 584 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 407 कोरोनावर मात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,08,290 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत शून्य रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,664 झाली आहे.
देशात 14 हजार 917 नवीन रुग्ण (Coronavirus Cases Today in India)
देशात रविवारी दिवसभरात 14 हजार 917 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या 825 रुग्णांची वाढ झाली आहे. याआधी म्हणजे शनिवारी 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशात 1 लाख 17 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. ही संख्या काल 1 लाख 16 हजारांवर होती. देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता देशात 1 लाख 17 हजार 508 कोरोना रुग्ण आहेत. तर शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 50 हजार 276 डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 7.52 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 4.65 टक्के आहे. तसेच देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे.