मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्क्यांवर आले आहे.. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज  881 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 963 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. 


राज्यात  963 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update) 


राज्यात बुधवारी  881 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 963 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात  पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,59, 133 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.11 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 5426 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 5426 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 1461 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1201  सक्रिय रुग्ण आहेत.


 देशात पाच हजारहून अधिक नवे रुग्ण


देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी मंगळवारी 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तुलनेनं कोरोना रुग्णांच्या संख्येत 739 रुग्णांची घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 45 हजार 746 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.1 टक्के आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत एकूण 215 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 19 लाख 25 हजार 881 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 98.71 टक्के आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 1.44 टक्के आहे. देशभरात मंगळवारी दिवसभरात 3 लाख 55 हजार 231 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.