Maharashtra Corona Cases : राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र कालपासून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिसून येत आहे. आज मृत्यूच्या आकड्यातही कालच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसत आहे.  राज्यात आज 11,766 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 8,104 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 406 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता तर काल आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. 


Maharashtra Unlock : राज्यात कोणत्या जिल्ह्यात निर्बंध कायम, कोणत्या जिल्ह्यात दिलासा? जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर


राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात आज एकूण 1,61,704 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 56,16,857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.4 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 10,04,770 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


Mumbai Corona Cases: मुंबईत आज 686 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर तर रुग्ण दुपटीचा कालावधी 596 दिवसांवर


मुंबईतील आकडा एक हजारांच्या आत


मुंबईतील आकडा हा एक हजारांच्या देखील आत आला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 658  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,81,946 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 15,819 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 598 दिवसांवर पोहोचला आहे.  मुंबईचा आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट साडेपाच टक्क्यांवरुन 4.40 % वर आला.  मात्र, तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच राहणार आहे. सध्या तरी चालू नियमांमध्ये  कोणताही बदल नाही. पॉझिटीव्हिटी रेट स्थिर असेल तर नियम बदलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, दर घसरल्यानंतर सध्या तरी मुंबईला लेव्हल 3 चेच निकष लागू करण्यात आले आहे. काल मुंबईत कोरोनाचे 660 नवीन रुग्ण आढळले. तर 768 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. दरम्यान काल कोरोनामधून 22 जणांचा मृत्यू झाला. मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.40  टक्के आहे.


पुणे शहरात आज नव्याने 239 कोरोनाबाधित 
 पुणे शहरात आज नव्याने 239 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 73 हजार 539 इतकी झाली आहे.   शहरातील 367 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 61 हजार 763 झाली आहे.  पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 3 हजार 320 रुग्णांपैकी 519 रुग्ण गंभीर तर 923 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे शहरात आज एकाच दिवसात 6  हजार 76 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 67 हजार 412 इतकी झाली आहे.