Maharashtra Corona Update: आज राज्यात 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर
Maharashtra Corona Update: आज राज्यामध्ये 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे. आज राज्यामध्ये 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 40 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के आहे. राज्यात सध्या 41672 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज राज्यात 2583 नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज 28 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 57164401 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 6524498 (11.41टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 275736 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1677 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 20, 2021
२० सप्टेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण-४१९
२४ तासात बरे झालेले रुग्ण-४४७
बरे झालेले एकूण रुग्ण-७१९३९४
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-४५९५
दुप्पटीचा दर-११९४ दिवस
कोविड वाढीचा दर (१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर)-०.०६%#NaToCorona
पुण्यात 86 नवे कोरोनाबाधित
पुणे शहरात आज दिवसभरात 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९९ हजार ४५९ इतकी झाली आहे. शहरातील २३७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८८ हजार ८८४ झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ९ हजार ००४ इतकी झाली आहे.