Maharashtra Complete Lockdown LIVE | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारवाईला सुरुवात, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दहा हजारांचा दंड वसूल

Maharashtra Complete Lockdown LIVE Updates : राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असतील. सरकारीसह खासगी कार्यालयात 15 टक्के उपस्थितीची अट आहे. तर सर्वसामान्यांसाठी लोकलसह मेट्रो प्रवास बंद तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Apr 2021 10:06 AM
साताऱ्याच्या हद्दीवर ऑक्‍सिजनचा टँकर अडवला , सातारा जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यात वाद

साताऱ्याच्या हद्दीवर ऑक्‍सिजनचा टँकर अडवला , सातारा जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यात वाद, ऑक्‍सिजनचा टँकर आमचा असल्याचा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा दावा तर सातारा जिल्हाधिकाऱ्यांचाही टॅंकर आमचाच असल्याचा दावा,  टँकर पोलीस बंदोबस्तात उभा, साताऱ्याच्या हद्दीवरील घटना, दोन जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा सुरू

भिवंडीत पेट्रोल पंपावर वाहनचालकांची मोठी गर्दी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आलाय. मेडिकल सुविधा वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा देणारे दुकानात तसेच पेट्रोल पंप यांना सकाळी 7 ते 11 यादरम्यान दुकान सुरू करण्याची मुभा आहे. त्यामुळे भिवंडीत शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी झाली आहे. 11 नंतर पेट्रोल पंप बंद होणार या भीतीने वाहन चालकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांना आज रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होणार नाही

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांनाही आज रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होणार नाही. आज रेमडेसिवीर इंजेक्शन्स आलेलीच नसल्यानं आज त्यांचं वाटप होणार नसल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलंय. पुणे जिल्ह्यात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण असुन 28 हजारांहून अधिक रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  तर पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमधे मिळुन एक लाख 42 हजार इतके कोरोनाचे ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. 

रेमडेसिवीर मिळवण्यासाठी राज्य सरकारची आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती

- रेमडेसिवीर मिळवण्यासाठी राज्य सरकारची आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात,  या जाहिरातींना काही देशातून प्रतिसाद,  सिंगापूर, बांगलादेश, इजिप्त या देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शन्स पुरवण्यासाठी प्राथमिक तयारी दाखवली आहे, महाराष्ट्राने आंतराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय आवारात पोलिसांची विनामास्क कारवाई

कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम कडक केली आहे.  मागील 20 दिवसात पालिका प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल 12 लाख 6 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दंड वसूल करण्याच्या पावती पुस्तके पोलिसांना देखील देण्यात आली असून पोलीस देखील थेट विनामास्क नागरिकांवर कारवाई करताना दिसत आहेत. आज  पोलिसांनी थेट पालिका मुख्यालयातच कारवाईसाठी धडक दिली. पालिका मुख्यालयात ठराविक नागरिकांनाच प्रवेश दिला जात असल्यामुळे मुख्यालयात येणारे कर्मचारी अनेकदा विनामास्क असतात. मात्र अशा ठेकेदार, कर्मचारी यांना आज दंडात्मक करवाईला सामोरे जावे लागले. 

मनमाडच्या कॅम्प भागातील तरुणांकडून गरजूंना मोफत अन्नछत्र

सध्या कडक निर्बंध असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद आहेत. हातावर पोट भरणाऱ्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. अशा लोकांना एक वेळचे पोटभर जेवण मिळावे या भावनेतून मनमाडच्या कॅम्प भागातील काही मित्रांनी एकत्रित येत गरजूंना मोफत अन्नछत्र सुरु केल आहे. दुपारी बारा ते तीन यावेळेत हे अन्न वाटपाचं काम गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. जोपर्यंत लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरु ठेवण्याचा मानस या मित्रांनी व्यक्त केला आहे. 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारवाईला सुरुवात, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दहा हजारांचा दंड वसूल

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बिनकामाचं बागडणाऱ्यांकडून दहा हजारांचा दंड वसूल करायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील रशीद शेख यांच्या गाडीत जास्त प्रवासी होते, शिवाय प्रवासाचं कारण ही योग्य नव्हतं. म्हणून त्यांना दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांच्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले. एकावेळी दहा हजार रुपये दंड भरण्याच्या वेदनाही त्यांनी व्यक्त केल्या आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं.

मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची तपासणी, अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

ठाण्यातून मुंबईत येण्यासाठी मुलुंड टोल नाका येथे पोलीस वाहनांची तपासणी करत आहेत. मुंबई पोलिसांनी काढलेल्या आदेशानुसार अनेक कार चालकांनी यांच्या गाडीवर लाल पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे स्टिकर लावले आहेत. मात्र अनेक गाड्या अशा देखील आहेत त्यांनी स्टिकर लावले नाहीत. त्यामुळे पोलीस टोलनाक्यावरील अशा वाहनांची तपासणी करुन जर अनावश्यक कारणासाठी बाहेर पडले असतील तर त्यांच्यावर कारवाई करत आहे. तसेच अनेक दुचाकस्वारांवर देखील पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. 

अमरावतीत दीड हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा
संपूर्ण राज्यात आज रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 16 ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला असून अमरावती शहरात 45 ठिकाणी फिक्स पॉईंट लावले आहेत. तर संपूर्ण शहरांमध्ये दीड हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह या स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या. 
कडक लॉकडाऊनला नागपुरातही सुरुवात

1 मे पर्यंत महाराष्ट्र सरकारकडून लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनला नागपुरातही सुरुवात झाली आहे...


पोलिसांचा बंदोबस्त प्रत्येक प्रमुख रस्त्यावर आणि प्रमुख चौकावर पाहायला मिळत आहे..


रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना कडक चौकशीला सामोरे जावे लागत आहे.. 


ओळख पत्र दाखवणे आणि बाहेर निघण्याचा कारण सांगणं आणि तो कारण पोलिसांच्या नजरेने समाधानकारक असणं आता गरजेचे झाले आहे...


त्यामुळे लोकांनी एकतर विनाकारण बाहेर फिरू नये, नाही तर पोलीसी खाक्या ला सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे... 


विशेष म्हणजे नागपुरात पोलिसांनी काही प्रमुख रस्ते संपूर्णपणे बॅरिकॅडींग करून बंद केले आहे...


नागपूरच्या सीताबर्डी परिसरात कापड बाजाराचा रस्ता बॅरिकॅडींग करून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे... याच पद्धतीने शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर ही बॅरिकॅडींग करून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे..

कोल्हापूर शहरातल्या चौका-चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

राज्यामध्ये कडक लॉकडाऊनला सुरू होण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी आहेत.त्याआधी कोल्हापूर शहरातल्या चौका-चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे... अत्यावश्यक सेवेतील सोडून कोणताही नागरिक बाहेर पडू नये याची खबरदारी कोल्हापूर पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

राज्याला दर दिवशी 60 हजार रेमडेसिवीर मिळाले पाहिजे,राज्य सरकार करणार मागणी

केंद्राने राज्याला दिलेल्या रेमडेसिवीर वरून राज्य सरकारची अन्यायाची भावना,


राज्य सरकार केंद्राला लिहिणार पत्र,


राज्यातील कोरोना बाधित रुग्ण आणि त्यातील 10 ते 15% रुग्णांना रेमडेसिवीरची गरज असते ,


त्यामुळे राज्याला दर दिवशी 60 हजार रेमडेसिवीर मिळाले पाहिजे राज्याची मागणी,


केंद्राने राज्याला दिलेल्या पुरवठ्या बद्दल पुनर्रविचार करावा,
राज्य सरकार करणार मागणी

चिंचनाक्यावर चिपळूण पोलिसांची गस्त, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी करुन त्यांचे वाहन जप्त करावे, असे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर चिपळूण येथील पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. चिपळूण येथील चिंचनाक्यात पोलिसांनी नाकाबंदी करुन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. तर वाहनही जप्त करण्यात येत आहेत.

कडक निर्बंधांमुळे मुंबईतील हातावर पोट असलेल्या लोकांची चिंता वाढली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदीचे नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक आणि सरकारी कर्मचारी वगळता सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकल आणि मेट्रो सेवा बंद राहणार आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा नियम लागू राहिल. मात्र यामुळे मुंबईतील रोजच्या हातावर पोट असलेल्या लोकांची चिंता वाढली आहे.

लोकल सेवा सुरु असल्याने अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर

संचारबंदी लागू झाल्यानंतरही लोकलमधील गर्दी कमी झालेली नव्हती. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकल सेवा सुरु असल्यामुळे प्रत्येकजण  घराबाहेर पडत आहे. त्यामुळे कोण अत्यावश्यक सेवेतील आहे आणि कोण नाही हे कळत नाही. आज सकाळी आठ वाजताचे नालासोपारा रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी पाहायला मिळाले.

बुलढाण्यात रस्ते, बस स्थानक, मार्केटमध्ये शुकशुकाट

'ब्रेक द चेन'च्या निर्बंधांना बुलढाणा शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. रात्री 11 नंतर संपूर्ण शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. जिल्ह्यात 24 तासात 12 जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा हादरला आहे. कोरोनाचे कडक निर्बंध जाहीर होताच नागरिकही घरात बसून आहेत. स्वतःला जपायला लागल्याचे चित्र दिसून आले. बुलढाणा बस स्थानक बस आणि प्रवाशांशिवाय दिसून आलं. एकही प्रवासी बस स्थानकावर दिसला नाही. तसेच शहरातील रस्ते निर्मानुष्य होते. शहरातील मुख्य मार्केटमध्येही आज शुकशुकाट दिसत आहे.

दादर मार्केटमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, भाजी विक्रेत्यांना सहा फुटांचं अंतर ठेवून व्यवसाय करण्याची सूचना

राज्यात आजपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी आजही बाजारपेठेत गर्दी केल्याचं चित्र आहे. परंतु दादरच्या भाजी बाजारपेठेत आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त बाजारपेठ परिसरात तैनात करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. भाजी विक्रेत्यांमध्ये सहा फुटांचं अंतर ठेवत त्यांना व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर वेळोवेळी पोलिसांकडून लाऊड स्पीकरवरुन नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील केल्या जात आहेत. एकीकडे असं जरी असलं तरी दुसरीकडे दादर स्थानकाजवळील चित्र मात्र जैसे थे बघायला मिळालं. पोलिसांच्या आवाहनानंतरही भाजी विक्रेते आणि नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. 

महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिलपर्यंत 2लाख 69 हजार रेमडेसिवीर औषधं पुरवली जाणार

महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिलपर्यंत 2लाख 69 हजार रेमडेसिवीर औषधं पुरवली जाणार आहे. यामध्ये  झायडस कॅडेला 50 हजार, हेटेरो 50 हजार, मायलॅन 32 हजार, सिप्ला 92 हजार 400, सन 23 हजार, जुबिलन्ट 16 हजार, डॉ. रेड्डी 5 हजार 800 वायल पुरवणार  आहे. 

लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा

लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.

खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी

खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.


लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.

लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात

काय आहेत नियम?


लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. या नियमांचे उल्लघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.


खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.


लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.

सर्व सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार

काय आहेत नियम?
सर्व सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.


लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. या नियमांचे उल्लघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.


खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.


लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.

ब्रेक द चेनची अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी, 22 एप्रिलपासून लागू

ब्रेक द चेनची अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी, 22 एप्रिलपासून लागू

उद्या, 22 एप्रिलपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध, सरकारकडून नवीन नियमावली घोषित

उद्या, 22 एप्रिलपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध, सरकारकडून नवीन नियमावली घोषित

उद्या संध्याकाळी लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता

उद्या संध्याकाळी लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता, 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन राहणार, राजेश टोपे यांची माहिती

राज्यात आज 67,468 नवीन कोरोना रुग्णांचे निदान, तर 54,985 रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज 67,468 नवीन कोरोना रुग्णांचे निदान, तर 54,985 रुग्ण बरे होऊन घरी, तर राज्यात आज 568 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद 

नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती
राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच, नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून अचानक गळती झाली. रुग्णालयातील 131 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; नांदेडमधील घटना

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. कोरोना वॉर्डमध्ये मोठ्याने बोलू नका म्हंटल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला आणि त्याने थेट चाकू घेऊन डॉक्टरवर धावून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. रुग्णालयातील उपस्थितांनी आरोपीचा हात धरून चाकू काढून घेतल्याने अनुचित प्रकार टळला असून आरोपी भाऊसाहेब गायकवाड याच्या विरोधात शासकीय कामात अडथसला तसेच अन्य कलमानव्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील आरोपीस मुखेड पोलिसांनी केले अटक आहे.

अकोल्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तत्काळ सुरू करा, माजी राज्यमंत्री आमदार डॉ. रणजित पाटील यांची मागणी

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गेली कित्येक दिवसापासून तयार असलेले अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णासाठी तात्काळ सुरु करा, अकोला, बुलढाणा, वाशीम येथील अकोल्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सुरु करावे, अशी मागणी गेली एक वर्षांपासून राज्य सरकारकडे वारंवार करण्यात आली. परंतु, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आज कोरोना रुग्णांसोबतच दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांना औषधोपचारासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अश्या आणीबाणीच्या काळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तत्काळ सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे. सोबतचं कोरोनाच्या वॉर्डांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून जनता कर्फ्यू लागू

चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. या जनता कर्फ्यू अंतर्गत बुधवार ते रविवार सर्व किराणा दुकान, भाजीपाला-फळ विक्री, चहा आणि नाश्ता दुकानं देखील बंद राहणार आहेत. सध्या राज्यभर सुरु असलेल्या 'ब्रेक द चेन' चा अपेक्षित परिणाम चंद्रपूर जिल्ह्यात होत नसल्याने हा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. अनेक लोक किराणा आणि भाजीपाला घेण्याच्या नावाने घराबाहेर पडत असल्याचा आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील व्यापारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांसोबत एक बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगावच्या अबनाळी या 300 लोकवस्तीच्या गावात 144 जण कोरोनाबाधित

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अबनाळी गावात कोरोनाचे 144 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. खानापूर गावच्या अशोकनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट केली असता 144 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समजून आले आहे. गाव अत्यंत कमी लोकवस्तीचे असून गावची लोकसंख्या 300 च्या आसपास आहे. त्यामुळे गावातील निम्मे नागरिक कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी अबनाळी गावाकडे धाव घेतली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकच गावात कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याने प्रशासन संपूर्ण गावच कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्याची शक्यता आहे. गावातील बरेच जण नोकरी निमित्त महाराष्ट्र आणि गोवा येथे आहेत. त्यापैकी बरेच जण गावाकडे परतले आहेत. बाहेरुन आलेल्या व्यक्तींमुळे गावात कोरोनाचा शिरकाव झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पनवेलमध्ये लसीचा एकही डोस शिल्लक नाही

पनवेलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक लागला आहे. लसीचा एकही डोस शिल्लक न राहिल्यामुळे लसीकरण मोहिम बंद झाली आहे. 

पालघर : भरमसाट बिल आकारणाऱ्या खाजगी कोविड रुग्णालयांना चाप बसणार

पालघर : जिल्ह्यात काही दिवस झाले काही खाजगी कोविड सेंटर मध्ये  रुग्णांच्या उपचाराची भरमसाठ बिल आकारल्याच्या तक्रारी आल्या नंतर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आता या बाबतीत परिपत्रक काढले असून ज्या रुग्णालयाकडून नियम तोडून भरमसाट बिल आकारण्यात आल्यास त्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आत्ता भरमसाट बिल आकारणाऱ्या खाजगी कोविड रुग्णालयांना चाप बसणार आहे

कल्याणमधील झुंझाराव मार्केटमध्ये किराणा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; निर्णय योग्य मात्र वेळ वाढवा, व्यापारी, नागरिकांची मागणी

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध आणखी कडक केले आहे. आता जीवनावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु राहणार आहेत. कल्याणच्या झुंझाराव मार्केट इथल्या दाणा मार्केटमध्ये 100 हून जास्त किराणा दुकानं आहेत. आज सकाळी नऊनंतर या मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नागरिकांनी मास्क जरी घातला असला तरी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. यावेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाच स्वागत केलं, मात्र वेळ वाढवून द्या. ही वेळ कमी असून त्यामुळे आणखी गर्दी होईल. त्यामुळे वेळेबाबत पुन्हा एकदा विचार करा, अशी मागणी केली आहे.

देशातील आजची कोरोना स्थिती आणि एकूण आकडेवारी

  • एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 56 लाख 16 हजार 130

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 32 लाख 76 हजार 039 

  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 21 लाख 57 हजार 538

  • कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 82 हजार 553

  • देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 1 लाख 19 हजार 310 डोस 

देशात 24 तासांत 2023 रुग्णांचा मृत्यू, नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर

India Coronavirus Cases Today : देशभरात 13 कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तरिही कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. दररोज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा नवनवे उच्चांक रचत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1,67,457 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी शनिवारी 259,167 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 

लॉकडाऊनच्या शक्यतेने नाशिकमध्ये रेल्वे स्थानकासह बस स्टॉपवरही कामगारांची गर्दी

लॉकडाऊनच्या शक्यतेने गावाकडे परतणारे कामगार रेल्वे स्थानकापाठोपाठ बस थांब्यावरही गर्दी करत आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यावर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याची वाहतूक बंद होण्याची भीती वाटत असल्याने, आजच हे परप्रांतीय कामगार गावाकडे जाण्यासाठी गर्दी करत आहेत. हे कामगार नाशिकहून पुणे आणि पुण्याहून बिहारला जाणार आहेत.

किराणा, भाजीपाला खरेदीची वेळ दुपारी चार वाजेपर्यंत वाढवावी; नाशिकमधील व्यापाऱ्यांची मागणी

राज्य सरकारच्या नियमानुसार आजपासून किराणा, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. पण साडेआठ, नऊ वाजल्यापासून बाजरपेठेत गर्दी होत आहे. त्यामुळे 11 पर्यंतची वेळ दुपारी 4 वाजेपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. 

आपापल्या गावाला परतण्यासाठी परप्रांतीय मजुरांची पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी

राज्यातील कडक निर्बंधांमुळे अनेक उद्योगधंदे सध्या ठप्प आहेत. त्यातच 15 दिवस संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे ठप्प झालेल्या कंपन्यांमध्ये काम करणारे परप्रांतीय कामगार आपापल्या गावात परतू लागले आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकासमोर मोठी गर्दी होताना दिसत आहे.   

लॉकडाऊनच्या धास्तीने आपापल्या राज्यात जाण्यासाठी परप्रांतीय मुंबईतील LTT स्थानकावर

राज्यात कोरोनाची सद्यस्थिती पाहता आज रात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच कडक निर्बंधांमुळे काम बंद असल्यामुळे मुंबईत काम करणारे अनेक परप्रांतीय आपापल्या राज्यात जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर ज्यांचे आरक्षण आहे अशाच लोकांना रांगेतून स्टेशनच्या आत सोडलं जातं आहे. त्यासोबतच गर्दी टाळण्यासाठी आवाहन केलं जातं आहे.

पार्श्वभूमी

राज्यात आजपासून 1 मेपर्यंत कडक निर्बंध, सरकारकडून नव्या नियमांची घोषणा
राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय. लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा.  खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. किराणामालाची दुकाने, भाजीविक्री सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु राहणार. 


राज्यात बुधवारी विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात बुधवारी 67  हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे. राज्यात काल एकूण 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


कोरोना लस ठरतेय प्रभावी! लसीकरण झालेल्या 0.04 टक्के जणांना कोरोनाची बाधा, केंद्राचा अहवाल
लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरु आहे. तरी देखील अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे त्यामुळे लोकांच्या मनात आज देखील लस घ्यावी की नाही असा संभ्रम आहे. परंतु केंद्र सरकारने याविषयी आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार कोरोनाविरुद्धची लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 12.7 कोटी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकूण 1.1 कोटी कोवॅक्सिनचे डोस देण्यात आलेत. कोवॅक्सिनचा पहिल्या डोस 93, 56, 437 जणांना दिल्यानंतर यातील 4 हजार 208 म्हणजेच 0.04  टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. तर दुसऱ्या डोसनंतर देखील 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर येत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.