CM Uddhav Thackeray Konkan Visit LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन मुंबईच्या दिशेने रवाना

CM Uddhav Thackeray Konkan Visit Live Updates : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवारी) सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 May 2021 02:23 PM
Uddhav Thackeray Konkan Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन मुंबईच्या दिशेने रवाना

Uddhav Thackeray Konkan Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची पाहणी करुन मुंबईला परतण्यासाठी रवाना झाले आहे. रत्नागिरी विमानतळावरुन मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी आज तोक्ते चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेतला. सर्वात आधी रत्नागिरीत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन मुख्यमंत्री सिंधुदुर्गात पाहणी करण्यासाठी गेले. तिथे काही गावांमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली. 

मी वैफल्यग्रस्त नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

सिंधुदुर्ग : "कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे." अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. त्यानंतर सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलतानाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मी वैफल्यग्रस्त नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. 

कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतर ठरवणार : मुख्यमंत्री

कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतर ठरवणार, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सोबतच पंतप्रधान नरेंद्र महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही."

सहकार्य करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणवासियांच्या मदतीला

पंचनामे व्यवस्थित द्या, रितसर आढावा द्या, त्यानुसार आपण निर्णय घेऊ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कोकणवासियांना आश्वासन

CM Uddhav Thackeray Konkan Visit Live : रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधणार

CM Uddhav Thackeray Konkan Visit Live : तोक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोकणवासियांसाठी कोणती घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

CM Uddhav Thackeray Konkan Visit Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल

CM Uddhav Thackeray Konkan Visit Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल झाले आहेत. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतल्यानंतर थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणी दौरा करणार आहेत.


 

CM Uddhav Thackeray Konkan Visit Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यासाठी रवाना

CM Uddhav Thackeray Konkan Visit Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. रत्नागिरीला जाण्यासाठी मुख्यमंत्री मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर विरोधकांची टीका होण्याची शक्यता

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतल्यानंतर थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. विरोधी पक्षनेते दोन दिवसांपासून कोकणात  आढावा घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. त्यामुळे विरोधक या दौऱ्यावर टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Cyclone Tauktae : मुख्यमंत्री दौरा झाल्यानंतर नुकसानग्रस्तांसाठी काय मदतीची घोषणा करतात, याकडे सर्वांचं लक्ष

Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतल्यानंतर थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणी दौरा करणार आहेत. विरोधी पक्षनेते दोन दिवसांपासून कोकणात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. त्यामुळे विरोधक या दौऱ्यावर टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री दौरा झाल्यानंतर नुकसानग्रस्तांसाठी काय मदतीची घोषणा करतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका; शेकडो घरांची पडझड, तर लाखोंचं नुकसान

CM Uddhav Thackeray visiting Cyclone hit areas : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर अनेक ठिकाणी घरांच्या भिंती, झाडं कोसळली. तोक्ते चक्रीवादळामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काही लोक या वादळात जखमी झाले आहेत. 


Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका; शेकडो घरांची पडझड, तर लाखोंचं नुकसान

Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका

CM Uddhav Thackeray visiting Cyclone hit areas : तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे आंबा, काजू बागायतींचे झाले असल्याची माहिती अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. 


तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका; 3 हजार 375 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्रशासनाकडून प्राथमिक माहिती 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा कसा असेल, जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल?



  • सकाळी 8.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन

  • सकाळी 8.40 वाजता तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक 

  • सकाळी 9.40  वाजता  हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन, नंतर गाडीने वायरी तालुका मालवणकडे जाणार

  • सकाळी 10.10 वाजता वायरी, ता.मालवण येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 

  • सकाळी 10.25 वाजता गाडीने मालवण येथे आगमन व तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 

  • सकाळी 11.05 वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

  • सकाळी 11.30 वाजता  चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे गाडीने आगमन आणि नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक 

  • चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण

  • दुपारी 12.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि विमानाने मुंबईकडे प्रयाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज कोकण दौरा, तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार

CM Uddhav Thackeray visiting Cyclone hit areas : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आज कोकण दौरा करणार आहेत. तसेच प्रशासनाकडून तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. 

पार्श्वभूमी


मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवारी) सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. 


मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल?



  • सकाळी 8.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन

  • सकाळी 8.40 वाजता तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक 

  • सकाळी 9.40  वाजता  हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन, नंतर गाडीने वायरी तालुका मालवणकडे जाणार

  • सकाळी 10.10 वाजता वायरी, ता.मालवण येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 

  • सकाळी 10.25 वाजता गाडीने मालवण येथे आगमन व तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 

  • सकाळी 11.05 वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

  • सकाळी 11.30 वाजता  चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे गाडीने आगमन आणि नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक 

  • चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण

  • दुपारी 12.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण


Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका; शेकडो घरांची पडझड, तर लाखोंचं नुकसान


रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर अनेक ठिकाणी घरांच्या भिंती, झाडं कोसळली. तोक्ते चक्रीवादळामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काही लोक या वादळात जखमी झाले आहेत. 


तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका; 3 हजार 375 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्रशासनाकडून प्राथमिक माहिती


तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे आंबा, काजू बागायतींचे झाले असल्याची माहिती अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.