CM Uddhav Palghar Visit LIVE : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर
CM Uddhav Thackeray Palghar visit LIVE Updates : जव्हार मोखाडा भागात आजही कुपोषण, बालमृत्यू याचं प्रमाण मोठं असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यातून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार आहे.

Background
पालघर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघरच्या जव्हार दौऱ्यावर असून 9.30 च्या सुमारास त्यांचं जव्हारमध्ये आगमन होणार आहे . मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जव्हार दौऱ्यावर येत असून जव्हार मोखाद्यातील आरोग्य यंत्रणेची ते पाहणी करतील . जव्हार मोखाद्या सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात आज ही आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यानंतर तरी येथील आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे . जव्हार मधील जामसर येथील बाल उपचार केंद्र , कॉटेज हॉस्पिटल , खरवंद अंगणवाडी, घरकुलांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे. अवघ्या दोन तासांचा हा दौरा असला तरी यात आरोग्य यंत्रणेतील सुधारणा करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे. कारण जव्हार मोखाडा भागात आजही कुपोषण, बालमृत्यू याचं प्रमाण मोठं असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यातून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे.























