नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि 12 बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना गटनेता बदलण्याच्या मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे आणि 12 खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.. यावेळी शिंदेंनी 12 खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केलं शिवाय भावना गवळींचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, 2019 साली शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. जे अडीच वर्षापूर्वी झाले पाहिजे ते आम्ही आज केले आहे. 12 खासादारांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र मिळून काम करते तेव्हा प्रगती होते. लोकाभिमुख निर्णय घेण्यात सुरुवात केली आहे.ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी आहे त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा : राहुल शेवाळे
भाजप आणि शिवसेना युतीसाठी उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा झाली. मलाही युती करायची असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले. परंतु उद्धव ठाकरेंकडून विशेष सहकार्य मिळाली नाही असा खुलासा गटनेते राहुल शेवाळे म्हणाले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांसोबत मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर योग्य ते निर्णय घ्या.
संबंधित बातम्या :