नवी दिल्ली: भावना गवळी याच पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद असून  त्यांचा व्हिप हा सर्व 18 खासदारांना लागू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. आम्ही एनडीएचा घटक असून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनाच पाठिंबा देत आहोत असंही ते म्हणाले. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 


एनडीएमधून आम्ही बाहेर पडलो नाही, आम्ही एनडीएचेच घटक
आम्ही भाजपसोबत युती मोडली, पण एनडीएमधून बाहेर पडलो नाही. आम्ही तसं पत्र दिलं नाही. आम्ही आजही एनडीएचा घटक आहोत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण आम्ही एनडीएमधून बाहेर पडल्याचं पत्र दिलं नव्हतं. तसेच आम्ही यूपीएमध्ये आहोत असंही पत्र दिलं नाही.


युतीबाबत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची चर्चा
उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेना- भाजप युतीबाबत एक तास चर्चा झाली होती असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. मलाही युती करायची होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. युतीबाबत उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाल्याचं ते म्हणाले. 


भाजपशी युती करण्याविषयी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनीच आपल्याला युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला सांगितलं होतं. त्यानंतर युतीमध्ये संजय राऊतांनी खोडा घातला असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला. 


महत्त्वाच्या बातम्या :