मुंबई : देशाविसायांचं तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रभू श्रीराम (Shree Ram) अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात विराजमान झाले. राम मंदिरात प्रभू श्रीराम विराज झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार असे जाहीर केले होते. त्यानुसार ते 5 फेब्रुवारली जाणार आहेत. अयोध्या दौऱ्याची तयारी देखील सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येत जाण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राममंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला. अभिषेक सोहळ्यानंतर आज अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे.
5 फेब्रुवारीला अयोध्येत जाण्याची शक्यता
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आले होते. मात्र ते त्या सोहळ्याला गेले नव्हते. या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते.
एका तासात प्रभू श्रीरामाचं दर्शन
अयोध्येत रामभक्तांनी मोठी गर्दी कायम केली होती. मात्र आता राममंदिरातली दर्शन प्रक्रिया थोडी सुरळीत झाला आहे. आता एका तासात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येतंय. दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडण्यासाठी अर्धातास लागतोय. मंदिरात मोबाईलला परवानगी देण्यात आल्यानं भाविक फोटो आणि सेल्फी काढतायत.
पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी घेतलं रामाचं दर्शन
दर्शनासाठी मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी रामाचं दर्शन घेतलं. काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण झाली होती. भाविकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागली. दरम्यान गर्दीचं योग्य नियोजन न केल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले होते. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आठ हजार अतिरिक्त पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय. तर लखनौमधून अयोध्येला येणाऱ्या बसही थांबवण्यात आल्यात.
हे ही वाचा :