Ayodhya Development Plan : ऐतिहासिक (Historical) आणि पौराणिक (Mythological) शहर अशी ओळख असलेली श्रीरामाची अयोध्यानगरी (Ayodhya) आता अत्याधुनिकही (Modernized) दिसणार आहे. कारण उत्तर प्रदेश सरकारने (UP Government) अयोध्येच्या विकासाची (Ayodhya Development) जबाबदारी  प्रसिद्ध टाऊन प्लॅनर दिक्षु कुकरेजा यांच्यावर सोपवली आहे. कुकरेजा यांनी नवी दिल्लीत G-20 परिषदेसाठी भारत मंडपम आणि यशोभूमी कन्वेंशन सेंटर तयार केलं होतं. 


श्रीरामाची अयोध्यानगरी आधुनिक होणार (Sri Rama's Ayodhya will become Modern City)


प्रभू श्रीरामाची अयोध्यानगरी आता आधुनिक होणार आहे. दिक्षु कुकरेजा यांच्यावर अयोध्या शहराच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवी दिल्लीत जी20 परिषदेसाठी उभारलेलं "भारत मंडपम" आणि "यशोभूमी कन्वेंशन सेंटर" तयार करणाऱ्या दीक्षु कुकरेजा यांच्यावर अयोध्येला सुंदर बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


दिक्षु कुकरेजा यांच्यावर अयोध्येच्या विकासाची जबाबदारी (Dikshu Kukreja will be Responsible for Development of Ayodhya)


श्रीरामाची नगरी अयोध्या आता ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम ठेवून अत्याधुनिक ही दिसणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) अयोध्येच्या विकासाची जबाबदारी प्रसिद्ध टाउन प्लानर दिक्षु कुकरेजा यांना सोपवली आहे. दीक्षु कुकरेजा यांनीच G20 शिखर परिषदेच्या वेळेला आंतरराष्ट्रीय बैठकांसाठी तयार करण्यात आलेलं "भारत मंडपम" उभारलं होतं. याशिवाय, नवी दिल्लीत "यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर" दिक्षु कुकरेजा यांच्याच नियोजनानुसार उभारण्यात आलं आहे.


अयोध्येचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहणार (Historical and Mythological Importance of Ayodhya will Remain Same)


अयोध्येचा सौंदर्यीकरण आणि आधुनिकीकरण करत असताना अयोध्येचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावं याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून शरयूचे घाटही विकसित केले जाणार आहेत.. तर रस्त्यांचे रुंदीकरण ही नियोजनबद्ध पद्धतीने केले जाणार आहे.. त्यासाठीचा काही काम राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधीच पूर्ण झालं असून उर्वरित काम सोहळा पूर्ण होताच नव्या दमानं सुरू करण्यात आलाय...


कोण आहेत दीक्षु कुकरेजा? (Who is Dikshu Kukreja)


दिक्षू कुकरेजा (Dikshu Kukreja) हे प्रसिद्ध वास्तुविशारद (Architect) आहेत. दिक्षू कुकरेजा सीपी कुकरेजा आर्किटेक्ट्सचे (CP Kukreja Architects) व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आहेत. सीपी कुकरेजा ही देशातील सर्वोत्तम आर्किटेक्ट फर्म (Best Architect Firm) आहे. कुकरेजा यांचं काम प्रासंगिकता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह शाश्वत दृष्टीकोनासाठी ओळखलं जातं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ram Mandir Donation : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? अंबानी आणि अदानींकडून किती दान?