Maharashtra Politics: बीड : बीडच्या (Beed News) शिरुर तालुक्यात (Shirur Taluka) संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांच्या विकास कामासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. मी आणि पंकजा भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची बरोबरी करू शकत नाहीत, असं धनंजय मुंडे म्हणाले. लोक मला भाऊ आणि पंकजा मुंडे यांना ताई म्हणतात मात्र भगवान बाबा यांना बाबा म्हटलं जायचं तर गोपीनाथ मुंडे यांना साहेब म्हटलं जायचं त्यामुळे मी आणि पंकजा गोपीनाथ मुंडे साहेबांनी भगवान बाबा यांची बरोबरी करू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. 


कृषीमंत्री धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, "अनेक व्यासपीठावरून बोलताना लोक मला भाऊ आणि पंकजा मुंडे यांना ताई म्हणतात मात्र भगवान बाबा यांना बाबा म्हटलं जायचं तर गोपीनाथ मुंडे यांना साहेब म्हटलं जायचं त्यामुळे मी आणि पंकजा गोपीनाथ मुंडे साहेबांनी भगवान बाबा यांची बरोबरी करू शकत नाहीत आम्ही तुमची मुलं आहोत आम्हाला कोणत्याही नावाने हाक मारली तरी चालेल कारण आम्ही तुमची जबाबदारी घेतली आहे." तसेच, गोपीनाथ मुंडे साहेबांनी शिरूर तालुक्याची निर्मिती केली याच तालुक्याचा विकासाचा कळस आम्हाला चढवायचा आहे, असंही ते म्हणाले. 


दरम्यान, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातल्या लोणी गावात प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांच्या विकास कामासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याच विकास कामाचा भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं 


ऊसतोड मजुरांना ऊस बागायतदार शेतकरी बनवण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय : धनंजय मुंडे 


"बीड जिल्ह्यात मोठ्या संघर्षानं वडवणी तालुक्याची निर्मिती झाली आहे. यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांनी शिरूर तालुका व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि शिरूर हा तालुका झाला. त्यांचं स्वप्न होतं, शिरूर तालुक्याचा विकास व्हावा आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी या तालुक्याच्या विकासाचा कळस आता आपल्याला चढवायचा आहे. शिरूर तालुक्यातील अनेक शेतकरी हे ऊसतोड मजूर आहेत, ते इतर राज्यांमध्ये कामासाठी जातात. त्यामुळे या तालुक्यांमध्ये शाश्वत पाण्याची उपलब्धी करून देऊन ऊसतोड मजुरांना ऊस बागायतदार शेतकरी बनवण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला एकत्र येऊन पूर्ण करायचं आहे.", असं धनंजय मुंडे म्हणाले. 


राम मंदिराच्या लढ्यात मुंडे साहेब अटक असताना मी तुरुंगात त्यांची सेवा केलीय : धनंजय मुंडे 


राम मंदिराच्या लढ्यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे हे अटक असताना धनंजय मुंडे यांनी तुरुंगात त्यांची सेवा केली असल्याचा प्रसंग यावेळी बोलून दाखवला. नुकताच आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर साकार झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. 500 वर्षांचा वनवास नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात संपून दाखवला, असे देखील धनंजय मुंडे म्हणाले. त्यामुळे लहानपणीच पाहिलेलं राम मंदिराचं स्वप्न साकार झाल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.


सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन 


शिरूर तालुक्यातील कासार येथील संत खंडोजी बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच पर्यटन विकास योजनेंतर्गत संत खंडोजी बाबा देवस्थान येथे करण्यात येत असलेल्या सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभास आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनजय मुंडे यांनी उपस्थित राहून उपस्थित भविकांशी संवाद साधला. या निधीतून देवस्थान परिसरात सभामंडप, भव्य भक्त निवास, पेव्हर ब्लॉकिंग, उद्यान, सुशोभीकरण आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा हा मागास व ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, येथे शाश्वत विकासाच्या माध्यमातून जल संपन्नता आणून ऊसतोड कामगारांचा जिल्हा ते ऊस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख विकसित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहू, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


धन्या म्हणून हिणवलं, शिव्या शाप दिला, दगड मारले पण..: धनंजय मुंडे