Maharashtra Breaking News Live Updates : तानाजी सावंत यांच्या विजयावर राहुल मोटे यांना संशय, ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
धाराशिव ब्रेकिंग
विधानसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पहिल्यांदा दौऱ्यावर
तुळजापुरात आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार, त्यानंतर पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवणार
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाची धाराशिव ते तुळजापूर असं बाईक रॅलीचं नियोजन
मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा तिढा यावर मनोज जरांगे काय बोलणार ?
धाराशिव च्या परांडा तालुक्यात बिबट्याचा वावर
बिबटयाकडून दुग्ध जनावरांवर हल्ला
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
शरद पवारांना भीती पार्टी अर्धी होईल, येणाऱ्या निवडणुकीत लोकं थांबले पाहिजे
ईव्हीएम मान्य केला तर खचलेल्या मनस्थिती निवडणुका लढाव्या लागतील
मानसिक अवस्था हरलेला राहू नये म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसाठी बुस्ट करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत
उद्धव ठाकरे घेणार बाबा आढाव यांची भेट
पुण्यात दुपारी घेणार भेट
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आडवणूक, आमदाराची खरेदी केंद्रावर धडक
खुर्चीचा खेळ संपला असेल तर आता शेतकऱ्यांची काळजी करा; आमदार कैलास पाटलांची टीका
केंद्र सरकारचं सोयाबीन खरेदीचं ओलाव्याबाबतच 15 नोव्हेंबरच परिपत्रक, मात्र अजूनही अंमलबजावणी नाही
शेतकऱ्यांसाठी काळजीवाहू सरकारची काही भूमिका आहे का ? आमदार कैलास पाटील यांचा सवाल
धाराशिव ब्रेकिंग
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या विजयावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांना संशय
राहुल मोटे यांचा ईव्हीएम पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे शुल्क भरून अर्ज
राहुल मोटे यांचा 18 बूथ वरील ईव्हीएम वर संशय , एका बूथसाठी 47 हजार दोनशे रुपये भरले, 18 बुथवरील ईव्हीएम पडताळणीसाठी 8 लाख 49 हजार सहाशे रुपये भरले
ईव्हीएम मशीन मधील मायक्रो कंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी
परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत आणि शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्यात झाली होती चुरशीची लढत
शेवटच्या मतमोजणी फेरीत शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचा 1509 मतांनी झाला विजय
सातारा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या दरेगावी मुक्कामी आले आहेत. आज दिवसभरात गावच्या जननी माता मंदिर आणि उत्तेश्वर मंदिराचे दर्शन घेऊ शकतात सध्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे हे दरेगावी आल्यामुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे.... याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी
पार्श्वभूमी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीला (Mahayut) घवघवीत यश मिळाल्यानंतर आता राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. महायुतीत नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीला वेग आला आहे. भाजपा आणि शिवसेना या पक्षांत मुख्यमंत्रिपदावर सध्या चर्चा होत आहे. सोबतच कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळावीत, याचाही फॉर्म्यूला निश्चित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात सर्वदूर थंडीचा कडाका वाढला आहे. जागोजागो शेकोट्या पेटलेल्या दिसतायत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -