Maharashtra Chandrapur Accident : चंद्रपूर-मूल महामार्गावर भीषण अपघात (Accident News) झाला असून या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये धडक झाल्यानं अपघात झाला. अपघात झाल्यानंतर आग लागली आणि त्यानंतर ट्रकचे टायर फुटल्यानं आग आणखी भडकली. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, आगीमुळे काही लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. अजयपूर गावाजवळ काल रात्री (गुरुवारी रात्री) हा अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्यामुळे अपघात झाला. अपघातानंतर त्याठिकाणी मोठी आग लागली. एवढंच नव्हे तर त्यादरम्यान टायर फुटल्यानं आग आणखी भडकली. बघता बघता आगीनं रौद्र रुप धारण केलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.
अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे मृतदेहाची राख झाल्याची विदारक दृश्यं नजरेस पडली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे. ट्रकमधील 7 जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :