Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कारण आईसमान समजल्या जाणाऱ्या भावजयीवर दिरानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अत्याचार केल्यानंतर आरोपी दिर फरार झाला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, पीडितेच कुटुंब पळशी शिवारातील एका शेत वस्तीवर राहतात. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास पीडित महिला घराच्या पाठीमागील बाजूस लाईटच्या उजेडात बाजेवर बसून मोबाईल पाहत बसली होती. दरम्यान मध्यरात्री आरोपी त्या ठिकाणी आला आणि पीडित महिलेचा तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. यावेळी महिलेने विरोध करण्याचा प्रयत्नही केला मात्र जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडिता प्रचंड घाबरली होती. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. 


रात्री घडलेला सर्व प्रकार महिलेने कुटुंबातील सदस्यांना सांगितला आणि त्यानंतर बुधवारी सकाळी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय मराठे करत आहे.


नात्याला काळिमा फासणारी घटना..... 


भावजयीला आईसमान दर्जा दिला जातो. मात्र औरंगाबादच्या या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. तर पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा या घटनेचा धक्का बसला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथकही नेमले असल्याची माहिती समोर येत आहे. तर या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात  आहे. 


पत्नीवर डोळा ठेवतोस म्हणून बालपणाच्या मित्राला भोसकले.... 


औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात एका रिक्षाचालकाला त्याच्याच बालपणाच्या मित्राने चाकूने भोसकल्याची घटना समोर आली होती. पण उपचार सुरु असताना जखमीच मृत्यू झाला आहे. शेख कादर ( रा.समतानगर ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून शेख मेराज असे मारेकऱ्याचे नाव आहे. कादर आणि मेराज दोन्ही बालपणाचे मित्र आहे आणि दोघेही रिक्षाचालक आहेत. मात्र मेराज संशयी वृत्तीचा होता आणि आपल्या पत्नीवर कादरची नजर असल्याचा त्याला सतत वाटायचे. त्यामुळे त्याच्यात व कादरमध्ये 15 मे रोजी वाद झाला. त्यांनतर वाद एवढ्या विकोपाला पोहचला की, मेराज याने कादरला भोसकून पळ काढला. मात्र उपचार सुरु असताना बुधवारी रात्री कादरचा मृत्यू झाला आहे.