Pune Crime: मोबाईलवर अश्लील व्हिडीयो दाखवून 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याची घटना 2018 मध्ये जेजूरीत घडली होती. त्या नरधमाला न्यायालयाने 20 वर्षांची सक्तमजुरी आणि 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पवन राज कुडाळकर असं 24 वर्षीय नराधमाचं नाव आहे.
मागील दोन वर्ष या प्रकरणाची चौकशी सुरु होती. त्या चौकशीसाठी डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला आणि पीडित मुलीने नराधमाविरोधात साक्ष दिली.या दोन्ही पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा निकाल लागला.
हे संपुर्ण प्रकरण विशेष सरकारी वकील अरुंधती रासकर यांनी हाताळले. या प्रकरणात सुरुवातील अनेकांवर संशय व्यक्त केला मात्र शेवट 13 साक्षीदारांची तपासणी केली. त्यानंतर पवन राज कुडाळकर डीएनए चाचणीच्या पुराव्याने आरोपी स्पष्ट झाला. पीडित मुलीने देखील या प्रकरणी साक्ष दिली होती. त्यानुसार कुडाळकर या नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
7 मे 2018 रोजी जेजुरीत नेमकं काय घडलं होतं-
ही घडना 7 मे 2018 रोजी जेजुरीत घडली होती. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेच आईने जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी कुडाळकर मुलीला खाऊचं अमिष दाखवून घरात घेऊन गेला. त्यानंतर 9 वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडीयो बघण्यास भाग पाडलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, या आधीदेखील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक अश्लील व्हीडियोच्या वेबसाईट्स बॅनसुद्धा केल्या मात्र त्यातल्या काही वेबसाईट्स अजूनही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे या प्रकारच्या अत्याचाराचं सत्र सुरु आहे. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आलेख वाढता आहे. त्यामुळे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर प्रश्नचिन्ह आहे. या कायद्याचा योग्य वापर करण्यात यावा, असं अनेक नागरिकांचं मत आहे.