Maharashtra Budget 2024 Live Updates : बुलेट ट्रेनचं भूसंपादन पूर्ण, 7 हजार किमी रस्ता बांधणार, बजेटमधील मोठ्या घोषणा

Maharashtra Budget Session 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांकडून (Ajit Pawar) अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Feb 2024 04:52 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Budget 2024 Live Updates : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांकडून (Ajit Pawar) अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. अजित पवारांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची कविता सादर करुन भाषण सुरु केलं.  Ajit Pawar...More

Uddhav Thackeray on Budget : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प

महायुती सरकारने आज मांडलेलं बजेट म्हणजे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असं आहे. नवीन रस्त्याच्या घोषणा, पहिल्या घोषणाचे काय असा प्रश्न आहे. मराठी भाषा भावनांचा आम्ही उल्लेख केला तोच आहे. पुढच पाठ मागच सपाट, अशी सरकारची अवस्था आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.