Maharashtra Budget 2023:  राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करताना शिंदे-फडणवीस सरकारनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) हा पहिला अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पात राज्यातील मोठ्या प्रकल्पांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यात मेट्रोचं जाळं (Metro Rail Network in Maharashtra) पसरणार असून अनेक नव्या मेट्रो मार्गांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मेट्रोसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 


मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे असून 46 किलोमीटरचा मार्ग खुला झाला आहे, यावर्षी आणखी 50 किमीचा मार्ग खुला करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. याशिवाय 43.80 किमीच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6708 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोची 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो हे नवीन प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.


मुंबईतील नवीन प्रकल्प


मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या 9.2 किमीसाठी 4476 कोटींची तरतूद
मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या 12.77 किमी लांबीच्या मार्गासाठी 8739 कोटी रुपयांची तरतूद
मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा या 20.75 कि.मी. लांबीसाठी 5865 कोटी रुपयांची तरतूद


43.80 किमीच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6708 कोटी रुपये.


पुणे मेट्रोची 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत.  ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो हे नवीन प्रकल्प हाती घेण्यात येतील.



रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण


राज्याच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्प आणि एसटी बसस्थानकांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 


रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण
- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
- नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
- सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
- 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी


विमानतळांच्या विकासासाठी निधींची तरतूद


- शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
- बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे


इतर महत्त्वाच्या बातम्या: