Maharashtra Budget 2023: राज्यातील अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून त्यामाध्यमातून राज्याला विकासाच्या मार्गावर गतीशील ठेवण्यात येणार असल्याचं राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  मुंबई, नागपूर तसेच इतर शहरांतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास हे ध्येय समोर ठेऊन मुंबईचा सर्वांगिण विकास करण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


राज्यातील 100 बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तसेच पुरंदर या ठिकाणी नवीन विमानतळ बांधण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर  शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल बांधण्यात येणार आहे. मुंबईच्या सुशोभिकरणासाठी 1729 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 


पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अर्थसंकल्पातील घोषणा


Metro: मेट्रो प्रकल्प


- मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 किमी यावर्षी खुला


मुंबईतील नवीन प्रकल्प


- मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
- मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
- पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो


रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण


- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
- नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
- सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
- 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी


विमानतळांचा विकास...


- शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
- बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे


मुंबईचा सर्वांगिण विकास


- मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
- एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
- ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये
- गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी


रस्त्यांसाठी निधी...


- पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
- विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद
- रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी
- हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये
- आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये
- रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे
- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.
- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना
- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना