Maharashtra Budget 2021 : आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीची घोषणा देखील केली आहे. यात मद्यावरील व्हॅटमध्ये वाढ करण्यात येत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. यामुळं मद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅट 60 वरुन 65 टक्के करण्यात आला आहे. तर सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅटचा दर 35 % वरून 40% टक्के करण्यात आला असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. देशी बनावटीच्या मद्याचे उत्पादन शुल्क निर्मिती मूल्याच्या 220% किंवा 187 रुपये राहणार आहे.


Maha Budget 2021 | अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत घोषणा नाही; इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांची निराशा


पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत दिलासा नाही
वाढत्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना राज्याच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अशी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नसल्यामुळे नागरिकांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशासह राज्यात इंधन दरवाढीचा भडका उडालेला दिसत आहे. अशातच अर्थसंकल्पातून मात्र वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे.


Maharashtra Budget 2021 : रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री 


केंद्रानेच कर कमी करायला हवेत- अजित पवार
राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मात्र, विरोधकांना राजकारणचं करायचे असल्याने त्यांना ते दिसणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. पेट्रोल-डिझेल करात सूट न दिल्याने करण्यात आलेल्या टीकेवर अजित पवार म्हणाले, की केंद्राने इंधनावर भरमसाठ कर लावला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रानेच कर कमी करायला हवेत. कोविड संकटामुळे राज्यात आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे इंधनावरील टॅक्स कमी करता येणार नाही. उलट केंद्राकडे असलेले राज्याचे पैसे त्यांनी लवकर द्यावे, अशी आशाही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :