Maharashtra Breaking News Live Updates: विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 288 आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड 9 डिसेंबरला
Maharashtra Election Results News 07 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
Maharashtra Election Results News 07 December 2024 Live Updates: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले असून महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन झाले आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण असेल? याची उत्सुकता अवघ्या राज्यातील जनतेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेत. देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
Nandurbar: नंदुरबारमध्ये प्रकाशा पुलावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्याने ट्राफिक जाम
Nandurbar: नंदुरबारमध्ये प्रकाशा पुलावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्याने ट्राफिक जाम
प्रकाशा पुलापासून दोन्ही साईडने सुमारे 5 किलोमीटर ट्राफिक जाम....
ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी खराब झाल्याने वाहतूक कोंडी....
गेल्या 3 तासांपासून वाहतुकीची कोंडी, प्रवाशांना सहन करावा लागला मनस्ताप .....
प्रकाश पुलावर उसाचे ट्रॅक्टर अनेकदा होतात खराब त्यामुळे होते ट्रॅफिक जाम....
3 तासानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढण्यात सुरुवात....
वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्ष त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्येत दिवसेंदिवस वाढ..
मला वाटतं अजूनही आम्ही अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडलेलो नाहीत, ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी - रईस शेख
समाजवादी पार्टीचे रईस शेख आणि अबू आजमीचा उद्धव ठाकरेंना संकेत
शिवसेनाने (ठाकरे गट) आपली भूमिका स्पष्ट सांगावी.
कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत असतील तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू.
अखिलेश यादव यांच्यासोबत बोलूनच अबू आजमीने प्रतिक्रिया दिली असावी.
नंदुरबार येथील प्रकाशात ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी खराब झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
प्रकाशा पुलावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्याने ट्राफिक जाम झाला आहे.
पुलाच्या दोन्ही साईडने सुमारे 5 किलोमीटरचा हा ट्राफिक जाम आहे.
गेल्या अनेक तासांपासून वाहतुक कोंडी असल्याने प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रकाश पुलावर उसाचे ट्रॅक्टर अनेकदा खराब होतात.
3 तासानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढण्यात सुरुवात झाली आहे.
वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्ष असल्याकारणाने कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी, राजारामबापू साखर कारखान्याने 3275 रुपये दर जाहीर केलाय.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल व कारंदवाडी युनिटकडून सन 2024 - 25 हंगामातील उसाचा पहिला हप्ता 3200 रुपये प्रतिटन देणार आहे.
तर उर्वरित 75 रुपये दिवाळीस अदा करणार आहेत. एकूण अंदाजे 3275 रुपये जिल्ह्यातील उच्चांकी दर जाहीर करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिलीय.
तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी या निमित्ताने फुटली आहे.
मधुकर पिचड यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी
- मधुकरराव पिचड यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी राजुर येथे पोहचले.
- पिचड यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शन ठेवण्यात आले.
- अंत्यदर्शनासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी.
- घरच्यांना अश्रू झाले अनावर.
- पत्नी मुलगा, मुली आणी नातवंडे यांना अश्रु अनावर.