Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबागमध्ये आंदोलनाला सुरुवात
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
वसई:- वसई तालुक्यातील टिवरी ग्रामपंचायतचा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर
वसई तालुक्यातील टीवरी गावकऱ्यांनी ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवत २० डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या ग्रामसभेत पुढे येणाऱ्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे असा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर केल्याची माहिती मिळाली आहे.
ग्रामसभेत ईव्हीएम विरोधात ठराव मंजूर करणारी वसई तालुक्यातील ही पहिली ग्रामपंचायत असल्यांची सूत्रांची माहिती
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबागमध्ये आंदोलनाला सुरुवात होतेय. मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबागमध्ये आंदोलनाला सुरुवात होतेय. मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे
पुण्यात पुन्हा विचित्र अपघात
मद्यधुंद कार चालकाची ९ वाहनांना धडक
पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला अपघात
अपघातात एक तरुण गंभीर जखमी
दयानंद केदारी असं कारचालकाचं नाव कारचालकाला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
गाडी चालवताना कारचालक मद्यधुंद अवस्थेत
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाताना वाहन चालकाची अनेक वाहनांना धडक अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान
सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी नाही
छत्रपती संभाजीनगर:
नाताळच्या सुटीमुळे तिकिटे महागली
मुंबईच्या विमान प्रवासासाठी मोजा 1408 रुपये अधिक
नाताळच्या सुटीत बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांकडे प्रवाशांकडून तिकिटासाठी मागणी वाढली आहे. यामुळे विमान कंपन्यांनी तिकीट दरात विविध ऑफरच्या नावाखाली वाढ केली आहे. मुंबईसाठी नाताळ काळात 4944 रुपयांचे तिकीट 6352 रुपये झाले आहे. दिल्लीचे तिकीट 5185 रुपयांवरून 5710 रुपये, तर बंगळुरूचे तिकीट 8161 वरून 8875 रुपये झाले आहे. हैदराबाद येथे जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. हैदराबादचे तिकीट 8875 रुपयांवरून नाताळच्या सुटीच्या काळात, 2 जानेवारीपर्यंत 9055 रुपये केले आहे.
छत्रपती संभाजीनगर:
नाताळच्या सुटीमुळे तिकिटे महागली
मुंबईच्या विमान प्रवासासाठी मोजा 1408 रुपये अधिक
ANCHOR: नाताळच्या सुटीत बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांकडे प्रवाशांकडून तिकिटासाठी मागणी वाढली आहे. यामुळे विमान कंपन्यांनी तिकीट दरात विविध ऑफरच्या नावाखाली वाढ केली आहे. मुंबईसाठी नाताळ काळात 4944 रुपयांचे तिकीट 6352 रुपये झाले आहे. दिल्लीचे तिकीट 5185 रुपयांवरून 5710 रुपये, तर बंगळुरूचे तिकीट 8161 वरून 8875 रुपये झाले आहे. हैदराबाद येथे जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. हैदराबादचे तिकीट 8875 रुपयांवरून नाताळच्या सुटीच्या काळात, 2 जानेवारीपर्यंत 9055 रुपये केले आहे.
अँकर:- नाताळ सण आणि थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोड मध्ये आहेत,
मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली,
अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलिसांकडून साठे चौकात मध्य रात्री नाकाबंदी लावण्यात आली,
या नाकाबंदी दरम्यान रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहनांची तपासणी एमआयडीसी पोलिसांचा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून करण्यात आली.
या नाकाबंदी मध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक सोबत मध्य रात्री मध्ये फिरणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली,
नाकाबंदी मध्ये कशी आहे पोलिसांची कारवाईचे स्वरूप या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंह यांनी....
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारला आहे. काही मंत्र्यांनी तर पदरभार स्वीकारल्यानंतर लगेच कामाला सुरुवातही केली आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात असल्याने मुंडे अडचणीत आले आहेत. दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामुळेही राज्य सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात आहेत. या प्रमुख तसेच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -