Maharashtra Breaking News LIVE Updates : बॉलिवूड गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
LIVE
Background
मुंबई : सध्या देशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यातही राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने सत्ताधारी महायुतीतील तिन्ही पक्षातील काही नेते नाराज आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तर आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असला तरी राज्यातील जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील कार्यकर्ते आमचाच नेता पालकमंत्री होणार? असा दावा करत आहेत. काही मंत्र्यांनीही त्यांच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर आपला दावा केला आहे. त्यामुळे आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर होणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या प्रमख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन धाराशिवपर्यंत
धाराशिव ब्रेकिंग :
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन धाराशिवपर्यंत
हत्या प्रकरणात धाराशिवमधील कळंब येथून एका आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांची कारवाई
आतिष जाधव असं आरोपीचे नाव धाराशिवमधील उंबरे कोटा येथील रहिवाशी
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा ९ डिसेंबरला अपहरण करून खून करण्यात आला होता
भाडेकरुनी पाच लाखांची सुपारी घेऊन खून केल्याचं तपासात समोर आलेलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल, थोड्याच वेळात स्वीकारणार पदभार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल
थोड्याच वेळात दालनाचा स्विकारणार पदभार
महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर आता थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार
27-28 डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल, थोड्याच वेळात दालनाचा स्वीकारणार पदभार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल
थोड्याच वेळात दालनाचा स्वीकारणार पदभार
महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर आता थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार
इंदापूरच्या निमगावात रस्ता रुंदीकरणात जाणारं घर 75 फुट बाजुला सरकावलं
इंदापूरच्या निमगावात रस्ता रुंदीकरणात जाणारं घर 75 फुट बाजुला सरकावलं
इंदापूर तालुक्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे रुंदीकरणाचा काम सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत या मार्गाला बाह्य वळण देण्यात आलेय. मात्र याच बाह्यवळनाला अडसर ठरणारी तीन मजली 3600 स्क्वेअर फुटाची इमारत जशीच्या तशी मूळ जागेवरून उचलून 75 फूट बाजूला सरकवण्याचा प्रयोग निमगाव केतकी येथील येथील सुरेश म्हेत्रे व संजय म्हेत्रे करत आहेत आणि हाच करा चर्चेचा विषय ठरलाय. वडिलांची आठवण म्हणून ते घर जमीन दोस्त न करता मागे घेण्यात येत आहे. याआधी बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी देखील असा प्रयोग करण्यात आला होता.