Maharashtra Breaking News LIVE Updates : मयत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री संजय सिरसाट यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट...
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
ब्रेकिंग
मयत संतोष देशमुख हत्ये प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय सिरसाट यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट...
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत अर्धा तास चर्चा..
पोलीस तपासा संदर्भात घेतला आढावा तर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या केल्या सूचना..
एसपींच्या भेटी नंतर मसाजोग येथे जावून घेणार देशमुख कुटुंबाची भेट..
बीड ब्रेकिंग
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी बीड शहरात 28 तारखेला सकाळी 11 वाजता निघणार भव्य मोर्चा..
सर्वपक्ष, सर्व संघटना उतरणार रस्त्यावर..
बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर धडकणार मोर्चा...
बीड शहरात सर्वपक्षीय बैठकीत ठराव. बैठकीला आमदार, माजी आमदार, समन्वयक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
पुणे
खेड चे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा घेतली अजित पवारांची भेट
खेड मधून दिलीप मोहिते पाटील झाले होते पराभूत
मतदारसंघातील लाडक्या बहिणीना घेऊन मोहिते पाटील यांनी घेतली दादांची भेट
लाडक्या बहिणींनी अजित पवारांच केल अभिनंदन
पुणे
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अजित पवार यांची भेट घेतलीय.
पुण्यातील विविध विषयावर यावेळी पोलिस आयुक्तांनी अजित पवार याना माहिती दिलीय.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अमितेश कुमार यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केल आहे
ब्रेकिंग-
छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस
सागर बंगल्या येथे भेटीस दाखल
ब्रेकिंग
नागपूरच्या बुट्टीबोरी एमआयडीसी परिसरात केम टेक इंडिया कारखान्यात २ मजुरांचा मृत्यू…
पौष्टिक खाद्य तयार करणाऱ्या या कारखान्यात मशीनचा रॉड तुटल्याने कॅरेटड्रम मजुरांच्या शरीरावर कोसळल्याने घडली घटना…
घटने योगेंद्र दमाहे ( बालाघाट) व नवोदेत शिरसागर ( बालाघाट) या मजुरांचा मृत्यू झाला…
बुट्टिबोरी एमएडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना…
पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू …
छत्रपती संभाजीनगर:
कत्राटी कर्मचाऱ्यांनी
हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये
खोटी कागदपत्रे जोडून सरकारी रक्कम स्वत:च्या
खात्यात केली वळती
छत्रपती संभाजीनगरच्या
क्रीडा संकुलातील प्रकार
कवठेमहांकाळ तालुक्यातील
बोरगावजळ कारने पेट घेतल्याने २४ वर्षीय तरुणाचा गाडीतच जळून मृत्यू...
परभणीत आज शिवसेना भाजप मंत्र्यांसह काँग्रेसचे नेते राहुल गांधी
न्यायालयीन कोठडीत मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी व आंबेडकरी चळवळीतील नेते दिवंगत विजय वाकोडेंच्या घरी देणार भेट
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन संपले आहे. मात्र विरोधक सत्ताधारी फडणवीस सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लक्ष्य करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या विधानानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जातोय. दुसरीकडे राज्यात सर्वदूर थंडी वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. या सर्व प्रमुख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -