Maharashtra Breaking 9th July LIVE Updates: दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 09 Jul 2024 03:10 PM
Pune News : पुण्याच्या राजकरणातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे वसंत तात्या मोरे

Pune News : पुण्याच्या राजकरणातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे वसंत तात्या मोरे. त्यानी आज शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्री येथे हाती शिवबंधन बांधून उद्भव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी आपल्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार आहे, विधानसभा लढण्यास सांगितले तर लढू, नाहीतर नगरसेवक निवडणूक लढवूच, पुण्याची गुन्हेगारी वर ही काम करणार अशी प्रतिक्रिया या वेळी वसंत मोरे यांनी दिली.

Belagavi : बेळगाव गोवा मार्गावरील चोर्ला घाटात एका मद्यधुंद पर्यटकाचा भर रस्त्यात जाणारी येणारी वाहनं अडवून नाच करून धिंगाणा


Belagavi : बेळगाव गोवा मार्गावरील चोर्ला येथे धबधबे आणि निसर्ग सौंदर्य  पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत.प्रवाहित झालेले धबधबे, दाट धुके आणि डोळ्यांना सुखावणारी हिरवाई याचा आनंद घेण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.अशा वेळी एका मद्यधुंद पर्यटकाने भर रस्त्यात नाचण्यास सुरुवात केली. मद्याचा अंमल चढलेला असल्याने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची त्याला बिलकुल फिकीर नव्हती. रस्त्यात झोपून देखील त्याने आपल्या नृत्य कौशल्याचे दर्शन घडवले. ब्रेक डान्सचा आविष्कार देखील त्याने उपस्थित पर्यटकांना घडवला. मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकाच्या नृत्यामुळे पर्यटकांना निष्कारण मनस्ताप सहन करायला लागला. एका दुचाकी चालकाने त्याच्या अंगावर गाडी घातल्यासराखे केले पण तरीही तो बाजूला झाला नाही. मद्यपीच्या बेधुंद नृत्यामुळे पर्यटकांना आणि वाहन चालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. धोधो पाऊस पडत होता पण त्याची तमा न बाळगता मद्यधुंद पर्यटकाने भर रस्त्यात धिंगाणा घातला. मुसळधार पावसामुळे बेळगाव आणि परिसरातील अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत. वर्षा ऋतूतील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक येत आहेत.पण अशा मद्यधुंद पर्यटकांमुळे रंगाचा बेरंग होतोय.


Sindhudurg: दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा

Sindhudurg: दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा


भाजपकडून राजन तेली हे विधान सभेसाठी इच्छुक


सावंतवाडी विधान सभा मतदार संघ भाजपला मिळावा असा भाजप पदाधिकाऱ्यांचा ठराव


आज सावंतवाडी येथे भाजपच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला ठराव


या बैठकीला राजन तेली यांच्यासह जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी  माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक उपस्थित

Mumbai News: भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनखाली पडून पिता-पुत्राची आत्महत्या

Mumbai News: भाईंदर रेल्वे स्थानकातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे हृदय पिळवटून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.


 सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली


 सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. 


 प्लॅटफॉर्मवरून उतरून काही अंतर चालून गेल्यावर दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले.


 अचानक लोकल ट्रेनसमोर दोन जण येताना पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली आले.


 घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेले दोघेही पिता-पुत्र असून ते नालासोपारा येथील रहिवासी आहेत. 


 याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एडीआरशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Ahmednagar: लोकशाही असंघटित कामगार संघटनेचा रास्ता रोको

Ahmednagar: अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील लोकशाही असंघटित कामगार संघटनेच्या वतीने आज महिला कामगारांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून बस स्टॅन्ड समोर रस्ता रोको आंदोलन केले आहे. नगर जिल्ह्यातील असंघटित कामगार हजारोच्या संख्येने असून अहमदनगर येथील कामगार कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी नोंदणी करण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची खास करून महिला कामगारांची अडवणूक केली जाते. महिला कामगारांच्या होत असलेल्या अडवणुकीला कंटाळून आज कर्जत येथे संघटनेचे राज्याचे अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जर प्रशासनाने या महिला कामगारांची आढळून थांबवली नाही तर राज्यातील एक लाख कामगारांना बरोबर घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी दिला आहे.

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात जुहूच्या ग्लोबल तापस बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील

Worli Hit And Run Case: वरळीच्या हिट अँड रन प्रकरणात जुहूच्या ग्लोबल तापस बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दिवसांच्या तपासानंतर या बारला सील ठोकण्यात आले आहे. आरोपी मिहीर शहा आणि त्याच्या चार मित्रांनी याच बारमध्ये अपघाताच्या रात्री तब्बल 18 हजाराची दारू प्यायली होती रात्री उशिरापर्यंत मिहीर शहा आपल्या मित्रांसोबत जुहूच्या तापस बारमध्ये दारू पीत होता दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार मधील स्टॉक मोजण्याचे काम सुरू होते. अनियमित्ता आढळल्यामुळे आज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तापस बारवर कारवाई करण्यात आली आहे

Sanajay Raut: मुंबईत हिट अँड रन करुन पळालेला मिहीर शाह सुरतमध्ये आहे की गुवाहटीत? शिंदे-फडणवीसांनी खुलासा करावा; संजय राऊतांचे थेट वार

Sanajay Raut on Worli Hit And Run : मुंबई : मुंबईत (Mumbai News) हिट अँड रन (Hit And Run Case) करुन पळालेला मिहीर शहा (Mihir Shah) सुरतमध्ये आहे की, गुवाहटीमध्ये (Guwahati) असा थेट सवाल संजय राऊत (Sanjay raut) यांनी विचारला आहे. तसेच, एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून सुटतो कसा? असाही प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे. 

Beed Rain: बीडमधील आष्टी तालुक्यातील कडा परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस

अहमदनगर कडा जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.कडा येथे कडी नदीवरील जुना पूल तोडून नवीन पूल बांधकाम सुरु होते. या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या पुलावरून वळविण्यात आली होती.मात्र काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने कडी नदीला पूर आल्याने हा तात्पुरता पूल वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.या भागातील नागरिकांनी हा पूल पावसाळ्यापूर्वी करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती , आता या कामामुळे आता पूर्ण रस्ता बंद झाला आहे.

Maharashtra News : विधानपरिषद निवडणूकीसाठी महायुतीची महत्वाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे

Maharashtra News : विधानपरिषद निवडणूकीसाठी महायुतीची महत्वाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.


पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मत कशी द्यायची यावर देवेंद्र फडणीस महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहे. 


2022 च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मॅजिक केली होती आता तोच मॅजिक पॅटर्न पुन्हा चालवण्याची मुख्य जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली आहे. 


आपापला उमेदवार आणण्याऐवजी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदानाचा पॅटर्न निश्चित करणार आहोत. 

Kolhapur News: पंचगंगा नदीची पाणी पातळी उतरण्यास सुरुवात, मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे अद्यापही पाण्याखाली

Kolhapur News: पंचगंगा नदीची पाणी पातळी उतरण्यास सुरुवात


पंचगंगा नदीची आजची पाणी पातळी 32 फूट 8 इंच


कोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे अद्यापही पाण्याखाली

Wardha News: नाकाबंदीत दारुसाठा, वाहनासह 10 लाख 48हजारांचा मुद्देमाल जप्त

Wardha News: वर्ध्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे, पोलिसांनी नाकाबंदी करीत दरूसाठा जप्त केलाय. वाहनासह 10 लाख 48 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेय, दिन जनावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहेय.

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका, पुराच्या पाण्यात तीन हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका कुंदे गावातील बॉयलर कोंबड्यांना बसला असून पुराच्या पाण्यात तीन हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील कुंदे गावातील गौरीशंकर कदम यांच्या पोल्ट्री शेडमध्ये अतिवृष्टीचे पाणी भरून जवळपास तीन हजार कोंबड्या मृत झाल्या आहेत. तर 50 बॅग कोंबड्यांचे खाद्य आणि औषधे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्या कडून होत आहे.

Maharashtra News: राज्यात बिष्णोई गँगला वाढवायचं होतं खंडणीच रॅकेट, म्हणूनच भाईजानला धमकी

Maharashtra News: राज्यात बिष्णोई गँगला वाढवायचं होतं खंडणीच रॅकेट, मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात खुलासा


खंडणी उकळण्याच्या उद्देशानेच बिष्णोई गँगकडून सलमानच्या घरावरती गोळीबार.


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात खुलासा..


सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देऊन त्याच्या घरावरती गोळीबार करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न. 


सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातही खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न दिसतोय असाच जबाब दिला.


बिष्णोई गँगच्या या कृत्यांमुळे मी आणि माझं कुटुंब भीतीच्या वातावरणाखाली जगत आहोत असेही सलमानने मुंबई पोलिसांना जबाब सांगितलं.


या गोळीबार प्रकरणानंतर महाराष्ट्रात खंडणीच नेटवर्क मजबूत करण्याचा बिष्णोई गँगचा होता प्रयत्न. 


मुंबई पोलिसांनी सतराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये अनमोल बिष्णोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आलय.

Maharashtra News: महाविकास आघाडीचे नेते आज दुपारी तीन वाजता राज्यपालची भेट घेणार

Maharashtra News: महाविकास आघाडीचे नेते आज दुपारी तीन वाजता राज्यपालची भेट घेणार


विधानपरिषद सभापती पद निवडीबाबत राज्यपालकडे निवेदन करणार 


महाविकास आघाडीमधील विधान परिषदमधील नेते राज्यपालची भेट घेणार आहे. 


भेटीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब,काँग्रेस मुख्य प्रतोद बंटी सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे,सहीत अनेक आमदार असणार आहे.

Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही : सुनील तटकरे

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणालेत. तसेच महायुतीच्या नऊ उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी रणनीती आखल्याचंही तटकरे म्हणालेत. 

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीमुळे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीमुळे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन आलेत असंच म्हटलं पाहिजे. याचं कारण म्हणजे ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचं कळतंय. विधान परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. त्यामुळे कुठलीच रिस्क घ्यायची नाही अशी भूमिका ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतल्याचं दिसतंय. 2022 च्या विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेनं आपल्या आमदारांना पवईच्या रेनिसान्स हॉटेलमध्ये ठेवलं होतं. याच निवडणुकीनंतर एखनाथ शिंदेंनी बंड केला आणि काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये सत्तापालट झालं. 

Maharashtra News: मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा जीआर जारी

Maharashtra News: राज्यात मुलींना मोफत उच्च शिक्षण घेण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलाय. ज्या मुलींच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना आता मोफत शिक्षण देण्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Worli Hit And Run Case: अपघातानंतर मिहिर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याची सूचना

Worli Hit And Run Case: अपघातानंतर मिहिर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहिरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीला जवळपास तीस ते चाळीस फोन मैत्रिणीला केले. मैत्रिणीचे घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान आरोपी मिहीर शहा, त्याची आई आणि बहिणीने तेथून पळ काढल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालीये.  त्यामुळे याप्रकरणी मिहिरची आई आणि बहिणीलाही आरोपी करण्याची शक्यता आहे.

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँण्ड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी थंड डोक्याने योजना आखलेली

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँण्ड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी थंड डोक्याने योजना आखली होती अशी माहिती समोर आलीये. संपूर्ण शहा कुटुंबानेच मिहीरला वाचवण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय.

Nagpur Hit And Run Case: नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या दोन घटना

Nagpur Hit And Run Case: नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या दोन घटना घडल्या आहेत. गिट्टीखदान पोलीस
ठाण्याच्या हद्दीत अपघात, कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हिट अँड रन, मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारने उडवलं. दोन्ही घटनेत चालक घटनेनंतर फरार झाला. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Maharashtra Rain Updates: मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates: भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.  या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Mumbai Rain : मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं

Mumbai Rain : मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसानं काल अक्षरश: झोडपून काढलं. दरम्यान आजही भारतीय हवामान विभागाकडून मुंबई आणि मुंबई उपनगरसह आणखी पाच जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. 

Mumbai rain Updates: मुंबईत तूर्तास पाऊस नाही, त्यामुळे रेल्वे, रस्ते मार्गांवरील वाहतूक सुरळीत

Mumbai rain Updates: मुंबईत तूर्तास पाऊस नाही, त्यामुळे रेल्वे, रस्ते मार्ग  सध्या सुरू आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं आहे. हार्बर मार्गावरची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं आहे. पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. हवाईवाहतूकही वेळेत सुरू आहे. 

Akola News: अकोल्यात दोन दिवसांतल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत

Akola News: अकोल्यात दोन दिवसांतल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत झालंय. अकोल्यात अनेक सखल भागांत मोठं पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या मोठी उमरी आणि गुडधी रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. इतकंचं नव्हे तर हे रस्त्यावरील पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. मोठी उमरी भागातल्या अग्रवाल लेआउटमध्ये अनेकांच्या घरात घुसल्यानं इथल्या नागरिकांचे प्रचंड हाल होतायेत. अनेक घरांमध्ये अक्षरश: गुडघाभर पाणी साचलंय. दरम्यान, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नाल्याचं पाणी येथील रस्त्यावरून वाहतेय. अन् तेच पाणी इथल्या लोकांच्या घरात घुसलंय. या प्रकारानंतर अकोला महापालिकेनं केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरवलाय.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा, गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन


2. मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत, मध्य आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने, पश्चिम रेल्वेही वेळेवर, रस्ते वाहतूक विनाअडथळा


3. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळाही राहणार बंद.. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासन सतर्क


4. नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अॅण्ड रनच्या दोन घटना, गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर दुसऱ्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं


5. वरळी हिट अॅड रन प्रकरणात आरोपी मिहिरला पळून जाण्याचा वडीलांचा सल्ला, तर  मिहीर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव, पोलीस तपासात माहिती समोर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.